दौंड च्या कब्रस्तानात चालत होता जादूटोणा

Black magic kala jadu : एका महिले विरोधात दौड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

Black magic kala jadu daund kabristan news

Black magic kala jadu News : सजग नागरिक टाइम्स

दौंड मधील एका कब्रस्तानात एक महिला जादूटोणा करत असल्याचा प्रकार सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये कैद झाला .

या प्रकरणी दाखल झालेल्ल्या फिर्यादीवरून दौंड पोलिस ठाण्यात अमिना महेबूब सय्यद (रा. दीपमळा,दौंड) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

अधिक माहिती अशी की, मुस्लिम कब्रस्तान कमिटीचे अध्यक्ष हाजी कुबेल जब्बार कुरेशी (वय ३८, रा.कुंभार गल्ली, दौंड)

यांना दौंड येथील कब्रस्तानात एक महिला जादूटोणा करत असल्याचे सीसीटीव्हीत दिसले.

DIGITAL-BUSINESS-CARD-MK-DIGITAL-SEVAmk-digital-seva

वीज चोरी केल्याप्रकरणी हडपसर मधील “शिक्षणसम्राटा ”वर महावितरणची कारवाई

कुरेशी यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी केली असता तेथे जाळलेले कागद ,फुले ,हळद , सुट्टे पैसे व जादूटोणा करण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले.

याबाबत कुरेशींनी पोलिसांत फिर्याद दिली आहे . अधिक तपास करत पोलिसांनी अघोरी कृत्य करणारी महिला नामे अमिना महेबूब सय्यद (रा. दीपमळा, दौंड)

हिच्याविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात अनिष्ट व अघोरी कृत्यांना प्रतिबंध , निर्मूलन व

काळा जादू नियम २०१३ चे कलम ३ (२) अनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती दौंड ठाण्याचे मारुती सूळ यांनी दिली.

पुणे शहरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचा पालिकेला पडला विसर.. वर्षभरात फक्त तीनच कारवाई