Homeपुणेकोंढव्यात इमारती वरून खाली पडून कामगार ठार ?

कोंढव्यात इमारती वरून खाली पडून कामगार ठार ?

kondhwa news :कोंढव्यात इमारतीचे काम करत असताना वरून खाली पडून कामगार ठार ?

Workers fell down from the building into a death kondhwa news

kondhwa news : जसे पुणे हे विद्देचे माहेर घर म्हणून ओळखले जाते तसेच आता कोंढवा हे अनधिकृत इमारतींचे माहेर घर होत आहे,

याला कारणीभूत आहे पुणे मनपाचा भोंगळ कारभार , अधीकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनधिकृत बांधकामाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

नवीन इमारत बांधताना पुणे मनपाची परवानगी घेणे बंधनकारक असतानाहि अनेक गुंठा मंत्री ती परवानगी घेत नाही,

गुंठा मंत्री स्थानिक राजकारण्यांना हाथाशी धरून अनधिकृत बांधकामे करत असतात,

एखादा अधिकारी जरी कारवाई करण्यास गेला तर राजकीय दबावापोटी त्याला माघारी यावे लागते,

या मुळे अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामांना ऊत आले आहे, कोंढवा भागात अनेक अनधिकृत बांधकाम चालू आहे .

दौंड च्या कब्रस्तानात चालत होता जादूटोणा

कोंढवा भागातील भाग्योदय नगर येथील कीर्ती कॉम्प्लेक्स शेजारी एका इमारतीचे बांधकाम चालू आहे ,हे कायदेशीर आहे कि बेकायदेशीर हे गुलदस्त्यात आहे ?

या इमारतीचे सेंट्रिंगचे काम चालू असताना दुपारी एक तरुण कामगार वरून खाली पडला व जखमी झाला,

त्या कामगाराला सत्यानंद हॉस्पिटल मध्ये नेले असता त्यांनी ससून हॉस्पिटल मध्ये नेण्याचे सांगितले

सदरील कामगाराला ससून हॉस्पिटल मध्ये नेल्यानंतर ससून हॉस्पिटलने त्या कामगाराला मृत घोषित केल्याची माहिती विश्वस्ताकडून मिळाली आहे .

कामगार जेव्हा एखाद्या ठेकेदाराकडे काम करतो त्याची जबाबदारी हि त्या ठेकेदाराने अथवा ज्याने त्याला ते काम दिले त्याची असते,

बांधकाम करताना सर्वांच्या सेफ्टीचा विचार करून बांधकाम करावे लागते , सदरील ठिकाणी तशी दक्षता घेतली गेली नसल्याचेच दिसते ?,

या मृत व्यक्तीच्या घरच्यांना याची नुकसान भरपाई मिळणार का ? दोषींवर कडक कारवाई होणार का ?

याबाबत कोंढव्यात चर्चेला उधाण आले आहे दोषींवर कारवाई होणार का यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

video news : Modi तुझको हाय लगेगी हाय हाय हाय म्हणत किन्नरांचे धरणे आंदोलन|Caa Nrc Npr

Share Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments