Homeताज्या घडामोडीओके भाईकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल व ५ काडतुसे जप्त

ओके भाईकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल व ५ काडतुसे जप्त

सजग नागरिक टाइम्स : सराईत गुन्हेगाराकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल व ५ काडतुसे 2 तलवारी जप्त. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांची कामगिरी.

रेकॉर्डवरील गुन्हेगार ओके भाई यास त्याच्या साथिदारासह जेरबंद करण्यात वानवडी पोलीसांना यश आले आहे. यावेळी गावठी पिस्तूल, जीवंत काडतुसे व धारधार घातक हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत.

वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांचा हद्दीतील गुन्हेगारांवर मोठा वचक निर्माण झाला आहे.

वानवडी पोलीस ठाणेकडील सहा. पोलीस निरिक्षक जयवंत जाधव व पोलीस अंमलदार सर्फराज देशमुख, राहुल गोसावी, निळकंठ राठोड, संदीप साळवे, अमोल गायकवाड हे वानवडी पोलीस ठाणेकडील दाखल गुन्हयामधील अटक आरोपीकडे तपास करीत असताना त्यांना सराईत गुन्हेगार नामे ओकेभाई ऊर्फ ओमकार चंद्रशेखर कापरे, रा. कोंढवा खुर्द, पुणे याचेकडे गावठी बनावटीचे पिस्टल असलेबाबत माहीती मिळाली.

“ओमकार कापरे हा पोलोस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून तो नेहमी सशस्त्र असतो तसेच तो जे.एस.पी.एम. कॉलेज परिसर येथे येणार आहे.” अशी बातमी मिळाल्याने सपोनि जयवंत जाधव यांनी सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांना कळविताच त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

वरिष्ठांचे परवानगीने तपास पथकातील स्टाफसह जे.एस.पी.एम. कॉलेज रोड, काळेपडळ, हडपसर, पुणे येथे जावून दोन टिम करुन सापळा रचुन थांबले असता, बातमीतील वर्णनाचा इसम व त्याचे सोबत आणखी एक इसम तेथे अहिल्यादेवी होळकर चौकाकडुन वैष्णवसिटी कडे जाणारे रोडने फुटपाथने चालत येताना दिसले त्यावेळी त्यांना अत्यंत शिताफीने जागीच पकडुन त्यांना प्रथम त्यांची नावे पत्ते विचारता त्यांनी त्यांची नावे १) ओकेभाई ऊर्फ ओमकार चंद्रशेखर कापरे, (रा. पर नं.०९, संत गाडगेबाबा शाळेसमोर, लक्ष्मी निवास, कोंढवा खुर्द पुणे) व

२) मनिष ऊर्फ आकाश मारुती झांबरे, (रा. झांबरे तालीम संघ, गणेश मंदिराजवळ, होळकरवाडी, ऊरुळी देवाची, पुणे) अशी असल्याची सांगीतले. त्यावेळी त्यांची दोन पंचासमक्ष अंगझडती घेता आरोपी नामे ओकेभाई ऊर्फ ओमकार चंद्रशेखर कापरे याचे कमरेचे पाठीमागे पैन्टमध्ये खोसलेले एक अग्नीशस्त्र मिळुन आले.

त्याचे मॅगझीन चेक केले असता त्यात ५ जिवंत काडतुसे देखील मिळून आली. ते त्यांचेकडुन जप्त करून ताब्यात घेण्यात आले. आरोपी ओमकार कापरे व आकाश झांबरे यांचेविरुध्द पो.ना. देशमुख यांनी फिर्यादी दिली असून त्यांचे दोघांविरुध्दही वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४३५ / २०२२ भारतीय शस्त्र अधि कलम ३(२५), ३५ महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७ (२) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन दाखल गुन्हयात नमुद आरोपीतांना अटक करण्यात आलेले आहे. तसेच त्यांचेकडील अंदाजे ९००/- रु. किंमतीच्या एस एस मटेरिअलच्या दोन धारदार तलवारीही जप्त करण्यात आलेल्या आहे.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular