पुणे प्रतिनिधी : कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसमध्ये ठेवलेली एसटी वाहकाची तिकिटांची पेटी चोरट्यांनी लांबविल्याची घटना शंकरशेठ रस्त्यावर घडली.
याबाबत शिवशरणप्पा हंगरगी (वय ५७, रा. काजी काॅलनी, बिदर, कर्नाटक) यांनी या संदर्भात खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हंगरगी कर्नाटक परिवहन महामंडळात वाहक आहेत.शंकरशेठ रस्त्यावरील ढोले पाटील चौकात (सेव्हन लव्हज चौक) बस लावण्यात आली होती.
चोरट्यांनी तिकीट काढण्याचे यंत्र, तिकीट पेटी असा मुद्देमाल लांबविला. पेटीतील कागदी तिकिटांची किंमत ३५ हजार ३०० रुपये असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तिकिटाची पेटी चोरीस गेल्यानंतर त्यांनी स्वारगेट पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलीस हवालदार शेख तपास करत आहेत.