महाराष्ट्रराष्ट्रीय

शिंदे फडणवीसांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात येणार दोन मोठे प्रकल्प ,केंद्र सरकारची मोठी घोषणा

Advertisement

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी – मुंबई : अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आता महाराष्ट्रात आता दोन मोठे प्रकल्प येणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीने ही घोषणा करण्यात आली आहे.

Advertisement

पुण्यात 1 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. इलेकट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि CDAC या दोन कंपनी पुण्यात गुंतवणूक करणार आहेत.केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली आहे.इलेकट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर ही कंपनी 600 कोटींची गुंतवणूक करणार आहे.

तर CDAC ही कंपनी 1 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे एकूण 1 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक या दोन कंपनी पुण्यात करणार आहेत.

Share Now