पुणे प्रतिनिधी : राळेगणसिद्धी पारनेर…शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाधिकारी व प्रतिनिधींकडून आज दिनांक 1 नोव्हेंबर रोजी राळेगणसिद्धी पारनेर जिल्हा अहमदनगर येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना राज्य अन्न आयोगाने शेतकऱ्यांच्या हितासाठी दिलेल्या आदेशाची प्रत व अन्य निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन यापुढे बंद करू नये, डीपी किंवा ट्रान्सफॉर्मर बंद करू नयेत, शेतकऱ्यांना विना खंडित सलग कृषी पंपासाठी विद्युत पुरवठा करावा,असे आदेश महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाने शरद जोशी विचारमन शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार राजे पुणे व श्री सचिन धांडे जळगांव व श्री बळीराम सोळंके बिड यांनी संयुक्तरित्या दाखल केलेल्या याचिकेवर झालेला निर्णय हा राज्यातील दोन कोटीहून अधिक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल असे मत जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी व्यक्त केले.
शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने सातत्याने अनेक अशा पद्धतीने मोठमोठे निर्णय आंदोलने मोर्चे काढत व सामाजिक शांततेच्या मार्गाने न्याईक बाजूने न्याय मागत मोठे कार्य केले असल्याबाबत अण्णांनी समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांची कृषी पंपाचे वीज कनेक्शन कट करु नये या आयोगाने दिलेल्या आदेशावर राज्य सरकार, मंत्रिमंडळ यांच्याकडून तत्काळ परिपत्रके आदेश काढून विद्युत वितरण पारशांवर डिस्ट्रीब्यूशन कंपनीला व संबंधितांना द्यावेत.
संघटनेने अनेक मोठमोठे न्यायिक निर्णय मिळून शेतकऱ्यांना न्याय दिला आहे त्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस किमतीवर लावलेला हजारों कोटीचा इन्कम टॅक्स वसुलीला स्थगिती मिळवली त्यामुळे राज्यातील सर्वच सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच दूध दराबाबत करोडो रुपयांचे शेतकऱ्यांचे होत असलेले आर्थिक नुकसान तर पिक विमा आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान अशा चार-पाच मोठे मोठे आदेशाने राज्यातील शेतकऱ्यांना एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक ची मदत शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विठ्ठल पवार राजे यांनी न्यायिक व शांततेच्या मार्गाने मिळवून दिलेली त्यामुळे सन्माननीय ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी समाधान व्यक्त करत पवार राजे यांचे खास अभिनंदन केले.
यावेळी अण्णा यांचे कडून राज्य सरकारला पत्र देण्याची विनंती संघटनेच्या माध्यमातून विठ्ठल पवार राजे यांनी केली की राज्य अन्न आयोगाने दिलेल्या आदेशावर राज्य सरकारने तत्काळ परिपत्रक आदेश काढून राज्यातील सर्व संबंधित विभागांना आदेश द्यावेत अशी विनंती संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी केली यावेळी संघटनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष तथा राज्य उपसचिव मेजर सुभाष वाळुंज, संघटनेचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर, तसेच कामगार आघाडीचे अध्यक्ष हिरामण बांदल, सुभेदार अशोक गायकवाड व शेतकरी उपस्थित होते.
संघटनेचे निवेदन ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी स्वता स्वीकारले सदर बाबत संघटनेने केलेली विनंती मान्य करून तशा आशयाचा पत्र व्यवहार राज्य सरकारकडे केला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी भ्रष्टाचार विरोधी न्यासायचे दत्त आवारी, अण्णांचे सचिव अन्सार शेख व राम सातकर उपस्थित होते.यावेळी संघटनेच्या वतीने राज्य अन्न आयोगाने दिलेल्या आदेशाची प्रत निवेदन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हजारो कोटी रुपयांची थकीत एफ आर पी व 15 व्याज, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची काटेमारी रिकवरी चोरी रोखण्यासाठी साखर आयुक्त व राज्य सरकारने ऊस कारखाने सुरू होऊन देखील संघटनेने मागणी केल्याप्रमाणे संघटनेचे शेतकरी प्रतिनिधींची भरारी पथकांची नेमणूक केलेली नाही.
अशा अनेक लिखित तक्रारी केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या दुधाला आम्ही दराबाबत दिलेला आदेश व शासन परिपत्रकाच्या आदेशाचे पालन करणे बाबतचा पत्रव्यवहार निवेदन, तसेच राज्यातील अनेक साखर कारखान्यांमध्ये झालेल्या शेकडो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार च्या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आले. अण्णांकडून सर्व निवेदनाची दखल घेऊन शासनाकडे पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन यावेळी दिले अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.