ताज्या घडामोडीपुणेब्रेकिंग न्यूज

6 वर्षीय मुलाचे अक्षर सुंदर नसल्याच्या कारणावरून वर्गशिक्षिकेने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

Advertisement

सजग नागरिक टाइम्स: पुणे: विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षक हे विद्यार्थ्याला छोटी-मोठी शिक्षा करत असतात, परंतु क्वचितच शिक्षकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होते असाच एक प्रकार पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याचे हद्दीत घडला आहे . एका 6 वर्षीय मुलाचे अक्षर सुंदर नसल्याच्या कारणावरून वर्गशिक्षिकेने मुलाला मारहाण केली .

ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे . मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे .

यानंतर संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Advertisement

लुल्ला नगर येथील केंद्रीय विद्यालयात हा सर्व प्रकार घडला . याप्रकरणी एका 35 वर्षीय व्यक्तीने ही तक्रार दिली आहे .

त्यानुसार 35 वर्षीय शिक्षिकेविरोधात वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

फिर्यादी यांचा सहा वर्षीय मुलगा लुल्ला नगर येथील केंद्रीय विद्यालयात शिकण्यास आहे .

फिर्यादी यांच्या मुलाचे अक्षर छान नसल्यामुळे संबंधित शिक्षिकेने त्याला हाताने मारहाण केली .

तसेच यानंतर जर मारहाण झाल्याचे घरी सांगितले तर तुला आणखी मारेल , अशी धमकी या शिक्षिकेने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे .

वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास चालू आहे .

Share Now