हडपसर येथील शफी इनामदार विरोधात वानवडी पोलिसात आणखीन एक F I R दाखल,

(Shafi Inamdar) पुणे महानगर पालिकेने दुसऱ्यांदा शफी इनामदार विरोधात केला गुन्हा दाखल, इमारतीचे अनधिकृत बांधकाम भोवले.

(Shafi Inamdar) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी : पुणे :

police case has been registered against Shafi Inamdar

हडपसर सय्यदनगर येथील शफी यासीन इनामदार विरोधात इमारतीचे अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी पुणे महानगर पालिकेने दुसऱ्यांदा वानवडी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

हकीकत अशी की हडपसर हांडेवाडी रोड येथे इनामदार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे , सदरील इमारत हि तीन मजली इमारत असून त्या इमारतीत शफी इनामदार याचा मूलगा मुसद्दीक शफी इनामदार हा दवाखाना चालवित आहे.

Advertisement

त्या संदर्भात पुणे महानगर पालिकेतील कनिष्ठ उप अभियंता सोनवणे यांनी सदरील बांधकामासंदर्भात नोटीस बजावून खुलासा मागितला होता.

तो खुलासा शफी इनामदाराला करता आला नाही. त्या बाबतीत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम १९६६चे कलम ५२ नुसार पोलीसांत लेखी तक्रार दाखल केली होती.

त्या तक्रारीवर वानवडी पोलीस ठाण्यात अनधिकृत बांधकाम प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

“लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: मात्र कोरडे पाषाण “म्हणी प्रमाणे काम सदरील शफी इनामदारा चे आहे .

विध्यार्थ्यानचे जीवन घडावे म्हणून एक प्रामाणिक शिक्षक धडपड करत असतो .

विध्यार्थ्यांसमोर शिक्षक एक आदर्श असतो त्यांच्या पावला वरच पाउल ठेऊन विद्यार्थी आपले जीवन जगतात .

Advertisement

परंतु शासनाची फसवणूक करणारे शफी इनामदारा सारख्यांना पाहून विद्यार्थ्याच्या मनावर काय परिणाम होतील त्याचा विचार न केलेलाच बरा .

वाचा : वीज चोरी केल्याप्रकरणी हडपसर मधील “शिक्षणसम्राटा ”वर महावितरणची कारवाई..!

सदरील इनामदाराने सय्यदनगर , गुलामअली नगर भागात अनेक अनधिकृत बांधकाम केले असून अनेक दुकाने व घरे भाड्याने देलेली आहेत यांची पोलीस दफ्तरी व मनपात नोंदणी केली नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी सजग प्रतिनिधीला दिली.

Advertisement

या अगोदर हि शाळेचे अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे व अत्ता हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती फिर्यादी सोनवणे यांनी दिली आहे.

पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

Advertisement

One thought on “हडपसर येथील शफी इनामदार विरोधात वानवडी पोलिसात आणखीन एक F I R दाखल,

Comments are closed.