(Tipu Sultan jayanti ) इब्राहिम खान आणि मजहर खान यांनी हजरत टिपू सुलतान यांच्या इतिहासाची आणि इंग्रजा विरूध्द लढ्याची माहिती दिली.
(Tipu Sultan jayanti ) सजग नागरिक टाइम्स :
पुणे : काल दिनांक 20 नोव्हेंबर रोजी कोंढवा येथील कोनार्क मॉल येथे इनक्रेडिबल समाजसेवक गृप
व हम भारत के लोग व इतर सामाजिक संस्था यांच्या मार्फत “हजरत टिपू सुलतान ” यांची जयंती साजरी करण्यात आली.
इब्राहिम खान आणि मजहर खान यांनी हजरत टिपू सुलतान यांच्या इतिहासाची आणि इंग्रजा विरूध्द लढ्याची माहिती दिली.
वाचा : आजादी के दिवाने ,भाग ७ राष्ट्रतेज टिपू सुलतान
कबिरशेख यांनी पहिले मिसाईलमँन टिपु सुलतान यांची माहिती सांगितली .असलम इसाक बागवान यांनी याच्या सामाजिक कार्याचा आराखडा मांडला,
राजु सय्यद नासिर शेख, वाजिद खान यांनी त्याच्या जिवनावर आधेरीत माहिती स्थानिक नागरिकांना दिली,
यावेळी इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे पदाधिकारी शानु पठाण,
साहिल मणियार, अरबाज तांबोळी, घनश्याम मिश्रा सचिन अल्हाट, निखील जाधव इब्राहिम शेख,
महेमुद सय्यद, इस्माईल शेख, कासम शेख, खालिद सय्यद, सर्फराज आत्तार आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
सर्वानीं मिळुन “हजरत टिपू सुलतान यांना आदरांजली वाहिली
आणी उपस्थीताचे आभार इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी मानले.
वाचा : न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.