फडणवीसांनी दाखल केलेला दावा हा रिकामेपणाचा उद्योग : एड.सतीश उके, ऍड.समीर शेख

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

(claim filed by Fadnavis) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुणे आणि नागपूरच्या वकिलांविरुद्ध मुंबईच्या न्यायालयात अब्रूनुकसानीची तक्रार

(claim filed by Fadnavis) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे :

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी

त्यांच्या संदर्भात प्रेस कॉन्फरन्स घेणाऱ्या ऍड.सतीश उके, नागपूर आणि ऍड समीर शेख ,पुणे

या दोन वकिलांच्या विरोधात मुंबई महानगर न्यायालयात अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केली आहे.

Advertisement

वाचा : गंगा नदीत वाहून आलेले मृतदेह टायरने जाळले

६ सप्टेंबर २०१६ रोजी नागपूर मध्ये झालेल्या आर्किटेक्ट एकनाथ निमगडे खून प्रकरणाचा आरोपी हा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप करीत ऍड. सतीश उके व ऍड समीर शेख यांनी १९ मार्च २०२१ रोजी मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेतली होती,

त्यामुळे व्यथित झाल्याचे सांगत ६ मे २०२१ रोजी फडणवीस यांनी मुंबई महानगर न्यायालयात अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केली आहे,

या संदर्भात पुढील सुनवाई ३१ मे २०२१ रोजी होणार आहे.

Advertisement
claim filed by Fadnavis is an emptiness-adv-samir-shaikh

मुंबई मेट्रोपॉलिटन कोर्टात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या विरोधात दाखल केलेला अब्रू नुकसानीचा दावा म्हणजे रिकामेपणाचा उद्योग असून यामध्ये प्रगल्भतेचा अभाव दिसत आहे,अशी प्रतिक्रिया एड.सतीश उके आणि ऍड.समीर शेख यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

बुधवारी पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात या दोन्ही वकीलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

”सत्ता गेल्याने व करण्यासारखी कामे डोक्यात नसल्याने राज्याचे विरोधी पक्ष नेते रिकामे बसले आहेत, त्यामुळे “टाईमपास” करण्यासाठी माजी मुख्यमंत्री बालीशपणे असल्या रिकाम्या उद्योगाला लागले असावेत’, असे राष्ट्रवादी लीगल सेलचे प्रदेश सचीव ऍड समीर शेख यांनी म्हंटले आहे.

मंगळवारी सदर तक्रारी संदर्भात पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुंबईच्या महानगर न्यायालयात स्वतः उपस्थित राहिले होते.

Advertisement

त्यानंतर बुधवारी या दोन्ही वकीलांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘सदर तक्रार दाखल झाली असल्यास ती फडणवीसांची न्यायालयात उलटतपासणी करण्याची सुवर्ण संधी असेल’, असे ऍड सतीश उके यांनी म्हंटले आहे.

वाचा : कुख्यात गुंड माधव वाघाटे अंत्ययात्रेची रॅली प्रकरणी २ पोलीस निरीक्षकांची उचल बांगडी.!

Advertisement

One thought on “फडणवीसांनी दाखल केलेला दावा हा रिकामेपणाचा उद्योग : एड.सतीश उके, ऍड.समीर शेख

Comments are closed.

कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल