ताज्या घडामोडी

गंगा नदीत वाहून आलेले मृतदेह टायरने जाळले

Advertisement

(Ganga river) गंगेत वाहून आलेले मृतदेह टायरने जाळणारे पोलिस निलंबित

(Ganga river) लखनौ : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील बलिया येथे वाहून आलेले मृतदेह टायर व पेट्रोलने जाळण्याचा संवेदनशून्य प्रकार उघडकीस.

मृतदेह दहनाचा एक व्हिडीयो व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने व्हिडियोत दिसत असलेल्या पाचही पोलिसांना केले निलंबित .

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गंगेच्या पात्रात शेकडो मृतदेह प्रवाहित केले जात असल्याचे उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

video पहा

केंद्राने याची गंभीर दखल घेतली. नंतर दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी काठावर असलेल्या गाव भागांमध्ये नावांतून पेट्रोलिंग सुरू केले.

आता आढळलेल्या मृतदेहांवरं अंत्यसंस्काराचा विषय वादाचा होतो आहे.

गंगेत प्रवाहित करण्यात आलेले मृतदेह हे हिंदूंचे असताना त्यांचा दाहसंस्कार करण्याऐवजी दफनविधी केले जात आहेत.

बहुतांश दफनविधी हे प्रशासनाच्या सांगण्यावरूनच झालेत दैनिक पुढारी ने असे वृत्त प्रकाशित केले आहे.

त्यावरही टीका होऊ लागल्यानंतर या करतो एकदाचा दाहसंस्कार,

या वृत्तीतून बलिया येथे लाकडांऐजवी टायर व पेट्रोल हे इंधन वापरून मृतदेह जाळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नदीच्या काठावर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास मनाई केली आहे.

नदी त्यामुळे प्रदूषित होईल. सूचना देऊनही पोलिस नदी काठावरच मृतदेह पेटवून देत आहेत किंवा गाडत आहेत.

वाचा : मिशन अहले बैत Ajmer Sharif तर्फे Free Oxygen can च्या वाटपाचे आयोजन.

Share Now

One thought on “गंगा नदीत वाहून आलेले मृतदेह टायरने जाळले

Comments are closed.