तात्काळ मालमत्ता कर आकारणी आणि तात्काळ 16 कोटीची वसुली हे पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले
sajag nagrikk times हडपसर (प्रतिनिधी)- फुरसुंगी पेठेकडील दि मांजरी स्टड फार्म प्रा.लि.या नामांकित उद्योगसमूहाच्या मिळकतीत कमी कालावधीत नव्याने आकारणी करून तात्काळ रक्कम रू १६ कोटी इतकी रक्कम वसुल करण्याची उल्लेखनीय कामगिरी मनपाचे कर विभाग अधिकारी रवींद्र धावरे यांनी आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पाडली.
याकामी विलास कानडे महापालिका आयुक्त तथा कर आकारणी व कर संकलन प्रमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
प्रशासन अधिकारी रविंद्र धावरे,राजेश कामठे ,प्रकाश वालगुडे यांचे नियोजनानुसार विभागीय निरीक्षक अरुण शिंदे व प्रकाश कदम, नीलेश पवार,
विभागीय निरीक्षक यांचे सहकार्यातून पेठ निरीक्षक, रविंद्र गायकवाड,नवनाथ हरपळे महादेव पुणेकर,मारुती चोरघडे व संपर्क कार्यालयाकडील सर्व सेवक यांनी कामकाज पाहिले असल्याची माहिती मिळाली.
वाचा : अतिक्रमण कारवाई दरम्यान झालेल्या भ्याड हल्ल्याचा भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने जाहीर निषेध