Homeपुणेराष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने हडपसर क्षेत्रीय कार्यालयावर हंडामोर्चा आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने हडपसर क्षेत्रीय कार्यालयावर हंडामोर्चा आंदोलन

सजग नागरिक टाइम्स : तुळजाभवानी वसाहत ,साईनाथ वसाहत भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या निषेधार्थ पालिकेच्या भोंगळ कारभारा विरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली.

राक्षसी बहुमत असतानाही विकासकामे न राबविता केवळ भ्रष्टाचार करण्याचे काम भाजपचे नगरसेवकांनी केले, पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत  बैठक घेऊन भामा आसखेड पाणी पुरविण्याचे आदेश दिले तरी पाणीपुरवठा विस्कळीत आहे,

केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर रोष व्हावा हा यामागचा हेतू आहे पाणीपुरवठा करा अन्यथा हंडे डो घालणार असा इशारा माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी दिला.

वाचा : दि मांजरी स्टड फार्म प्रा.लि उद्योगसमूहाकडून पुणे मनपा तब्बल 16 कोटी रुपये मालमत्ता कराची केली वसुली

गाडीतळ भागातील झोपडपट्ट्यामध्ये पाणीपूरवठा विस्कळीत झाला असुन पालिकेच्या पाणीपूरवठा विभागाने सुरळीत केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे.

याप्रसंगी माजी महापौर वैशाली बनकर, नगरसेविका नंदा लोणकर, नगरसेवक योगेश ससाणे, माजी नगरसेवक सुनील बनकर, शहर उपाध्यक्षा शालिनी जगताप आदींसह नागरिक व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

वाचा : अतिक्रमण कारवाई दरम्यान झालेल्या भ्याड हल्ल्याचा भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने जाहीर निषेध

Share Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments