Homeताज्या घडामोडीमित्राने केला अल्पवयीन मैत्रीनीवर अत्याचार

मित्राने केला अल्पवयीन मैत्रीनीवर अत्याचार

Sajag Nagrikk Times: पुणे: सोशल मीडिया मुळे जगात काय चालले आहे याची माहिती झटपट मिळत असताना काही लोक याचा उपयोग करतात तर काही याचा दुरुपयोग करतात, तर काही लोकं इग्नोर करतात.

तरुणींनी यापासून माहिती घेऊन तरुणांच्या भूलथापांना बळी पडण्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी प्रयत्न करने गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करून तरुणांवर अंधविश्वास ठेवल्यामुळे अनेक गैरप्रसंग त्यांच्या सोबत घडत आहे .

असाच एक प्रकार वानवडी पोलिस ठण्याच्या हद्दीत घडला.
एका अल्पवयीन मुलीसोबत तरुणाने मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून तिला ‘ माझे तुझ्यावर प्रेम आहे . आपण लग्न करू , ‘ असे सांगत वेळोवेळी तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवले .

त्यातून ती गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .सदरिल प्रकार जानेवारी २०२२ ते जून २०२२ यादरम्यान घडला . याप्रकरणी वानवडी पोलिसांनी समीर महेबूब अत्तार ( वय १९ , रा . पुणे ) याच्यावर बलात्कारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे . याबाबत पीडित मुलीच्या आईने वानवडी पोलिसांत तक्रार दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular