करोनामुळे पुण्यात काही तासातच ४ जणांचा मृत्यू

coronavirus patients die :चारही रुग्ण ससून रुग्णालयात घेत होते उपचार

four-coronavirus-patients-die-today-in-pune-death-Sasun-hospital

coronavirus patients die : सजग नागरिक टाइम्स : करोनामुळे पुण्यात काही तासातच ४ जणांचा मृत्यू झाल्याने चिंता आणखी वाढली आहे .

मृतांमध्ये एका २७ वर्षीय तरुणाचाही समावेश आहे,या चौघांसह पुण्यातील मृतांचा आकडा ३८ वर पोहोचला आहे.

कोंढव्यातील ५० वर्षीय महिलेचाहि करोनाने मृत्यू झाला आहे , तिला रक्तदाबाचा हि त्रास होता,या महिलेवर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते.

भवानी पेठेतील सोनवणे हॉस्पिटल मधील दोन डॉक्टरांसह काही नर्स क्वारंटाईन

mk-digital-sevaDIGITAL-BUSINESS-CARD-MK-DIGITAL-SEVA

पर्वती दर्शनमधील २७ वर्षीय तरुणाला हि करोनाची बाधा झाली होती , या तरुणाला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,

त्या तरुणाचे अति मद्यपानाने यकृत हि खराब झाले होते, त्याचा हि आज मृत्यू झाला आहे.

घोरपडी येथील ७७ वर्षीय व्यक्तीला २ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते , त्यांचा तपासणी अहवाल करोना पॉझिटिव्ह आला होता ,

त्यांचे उपचार चालू होते.त्यांचा हि आज सकाळी मृत्यू झाला आहे.त्यांना किडनी व रक्तदाबाचा आजारहि होता.

mk-digital-seva

कोरोनामुळे पुण्यातील आणखी 22 ठिकाणे होणार सील..

कोंढव्यातील ४० वर्षीय महिलेला हि करोना संसर्ग झाला होता,या महिलेला दमा व मधुमेहाचा हि त्रास होता.त्यांचाही आज मृत्यू झाला आहे

सध्या पुणेकरांना करोना पेक्षा जास्त भीती हि ससून रुग्णालयाची वाटत आहे ,कारण मृताचा आकडा हा इतर रुग्णालयापेक्षा ससून मध्येच जास्त आहे .

video : Lockdown मध्येही EMI ची मागणी करणाऱ्या Bajaj Finance ला Ad.Wajed Khan कडून सडेतोड उत्तर

One thought on “करोनामुळे पुण्यात काही तासातच ४ जणांचा मृत्यू

Comments are closed.