corona-virus : पुणे महानगरपालिका आयुक्तांनी प्रस्ताव पाठवले जिल्हाधिकाऱ्यांकडे
.corona-virus : सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी : पुणे-कोरोना विषाणुमुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रणाकरिता दुस-या टप्यात पुणे शहरातील काही भाग सील करण्याबाबत
पुणे महानगर पालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी निर्णय घेतला असून त्यासाठी प्रस्ताव पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे पाठविला आहे.
आपत्ती व्यव्स्थापन विभाग पुणे महानगरपालिका पुणे शहरातील कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य आजारामुळे पुणे शहरात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे.
माजी स्थायी समिती अध्यक्ष रशिद शेखकडून पुणे मनपाला लाख रुपयांची मदत
सबब या कार्यालयाकडील उपरोक्त संदर्भाकित आदेशान्वये, पुणे शहरातील कोंढवा परिसर व सर्व पेठांचा परिसर (महर्षी नगर ते आर टी ओ कार्यालय) हा परिसर सील करण्यात आलेला आहे.
तथापि पुणे शहरातील काही विशिष्ट परिसरातील कोरोना बाधित रुग्णाची वाढती संख्या विचारात घेता
खालील प्रस्तावित केलेले लोकवस्तीचे विभाग सील करणे अत्यावश्यक असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
…………खालील प्रमाणे…….
१)प्रायव्हेट रोड पत्राचाळ,लेन क्र. १ते४८ व परिसर,ताडीवाला रोड प्रभाग क्र.२०
२) संपूर्ण ताडीवाला रोड
३) घोरपडी गाव,विकासनगर, बालाजीनगर, श्रावस्तीनगर प्रभाग क्र२
४) राजेवाडी,पद्मजी पोलीस चौकी,जुना मोटार स्टॅन्ड, संत कबीर, A.D. कॅम्प चौक,क्वॉटर गेट,भवानी पेठ प्रभाग .क्र. २०
५) विकास नगर,वानवडी गाव
६) लुम्बिनी नगर,ताडीवाला रोड
७) चिंतामणी नगर,हांडेवाडी रोड प्रभाग. क्र. २६ व २८
८) घोरपडी गाव,B.T. कवडे रोड
९) संपुर्ण लक्ष्मीनगर,रामनगर ,जयजवान नगर ,येरवडा प्रभाग क्र.८
११) पर्वती दर्शन परिसर,
१२) सम्राट हॉटेल ते पाटकर प्लॉट पुणे-मुंबई रस्ता ते भोसलेवाडी,कामगार आयुक्त
कार्यालय,रेल्वे रूळ डावी बाजु व उजव्या बाजुस नरवीर तानाजीवाडी चौक ते जुने शिवाजीनगर एस टी स्टॅन्ड,
पटेल टाइल्स,विक्रम टाइल्स, इराणी वस्ती सर्हे नं. ११ मज्जीदचा मागचा परिसर ते रेल्वे भुयारी मार्ग न ता वाडी,मनपा शाळा क्रमांक ४७ परिसर दोन्हीबाजू
video : Pune| Bhavani Peth मध्ये सर्वाधिक मृत्यू | भवानी पेठेत Corona मुळे 11 जणांचा मृत्यू.
१३) संपूर्ण पाटील इस्टेट परिसर प्रभाग क्र.१४
१४) संपूर्ण भोसलेवाडी परिसर व वाकडेवाडी परिसर प्रभाग क्र. ७
१५) NIBM रोड कोंढवा प्रभाग क्र.२६
१६) संपूर्ण कोंढवा खुर्द परिसर
१७) संपूर्ण कोंढवा बुद्धुक परिसर
१८) साई नगर कोंढवा प्रभाग क्र.२७
१९) संपूर्ण विमाननगर प्रभाग क्र. ३
२०) वडगावशेरी परिसर प्रभाग क्र.५
२१) धानोरी प्रभाग क्र.१
२२) येरवडा प्रभाग क्र.६ उपरोक्त नमूद परिसर भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार सील करण्यात येऊन सदर परिसरात संचारबंदी/ जमावबंदीचे आदेश लागू करण्याची मागणी केली आहे.