Distribution 2 ventilators : पुणे महानगर पालिकेला व नॅशनल हाॅस्पीटल कोंढवा यांना प्रत्येकी एक व्हेंटिलेटर देण्यात आले.
Distribution 2 ventilators : सजग नागरिक टाइम्स
पुणे :कोरोना प्रादुर्भावामुळे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता वैद्यकीय सुविधा विशेषतः व्हेंटिलेटर्सची कमतरता जाणवते आहे,
या जाणिवेतून आज दिनांक २ आॅक्टोंबर २०२० रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते,
नगरसेवक अॅड.हाजी गफुर पठाण यांच्या स्वनिधीतुन पुणे महानगर पालिकेला व नॅशनल हाॅस्पीटल कोंढवा यांना प्रत्येकी एक व्हेंटिलेटर देण्यात आले.
यावेळी उपस्थित शिरुर लोकसभेचे खासदार डाॅ.अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, आमदार सुनिल शेळके,
पुणे म.न.पा.आयुक्त विक्रम कुमार, विरोधी पक्षनेत्या दिपालीताई धुमाळ, नगरसेविका नंदाताई लोणकर,
वाचा > महाराष्ट्रात 5ऑक्टोबर पासून बार व हॉटेल सुरु
नगरसेविका शिल्पा भोसले,अल्पसंख्यांक अध्यक्ष अजिम गुडाकुवाला, मोहसीन शेख, उल्मा-ए-किराम मध्ये मौलाना आय्युब अशरफी,
मौलाना निजामुद्दीन, मौलाना मन्सूर, मौलाना हमीद जलीस,प्रोफेसर अजहर वारसी, सय्यद सर,
प्रोफेसर रियाजुद्दीन सर, डाॅ शकील,आबीदभाई सय्यद,इम्तियाज शेख,हानिफ शेख, जहिर शेख,सलीम शेख,इरफान मुलाणी आदि उपस्थित होते.
वाचा :> भवानी पेठेतील सराईत गुन्हेगाराचा कोंढव्यात खुन
यावेळी अजित पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की नगरसेवक गफुर पठाण हे कायमच अशा सामाजिक उपक्रमात नेहमी अग्रेसर असतात,
व यापुढेही नेहमी असे समाजउपयोगी कार्य त्यांच्या हातून घडत रहावे,
अशी इच्छा व्यक्त करतो आणि ज्या पोर्टेबल व्हेंटिलेटर ची महानगरपालिकेला गरज होती तेच पठाण यांनी दिले.
कार्याक्रमाच्या शेवटी गफुर पठाण यांनी उपस्थित सर्वाचे आभार मानले