Homeताज्या घडामोडीपुणे बंदला ४० मुस्लिम संघटनांचा जाहीर पाठिंबा

पुणे बंदला ४० मुस्लिम संघटनांचा जाहीर पाठिंबा

सजग नागरिक टाइम्स : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केल्या जात असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या निषेधार्थ मंगळवारी ( दि . १३ ) पुणे बंद पाळला जाणार आहे . या बंदमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात सामील होणार असून , ४० मुस्लिम संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे . रविवारी कॅम्प भागातील लेडी हवाबाई शाळा बाबाजान दर्गा येथे समन्वय समितीसोबत बैठक झाली.

मा. न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, शिवप्रेमी संतोष शिंदे, प्रशांत जगताप, अरविंद शिंदे, संजय मोरे, या सर्व शिवप्रेमी संघटनासोबत साधारण 200 मुस्लिम कार्यकर्ते सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, धार्मिक क्षेत्रातील मौलाना मान्यवर उपस्थित होते.

या सर्वांच्या उपस्थितीत मुस्लिम बांधव 13 डिसेंबरच्या बंद मध्ये सामील होण्याची घोषणा व तसा अधिकृत पाठिंब्याचे पत्र त्या ठिकाणी दिले आहे.

छत्रपती शिवाजी मार्केट व्यापारी संघटना, जमाते इस्लामी हिंद, जमियत उलेमा हिंद, जमीयतूल कुरेश, एम आय एम, ॲक्शन कमिटी, उम्मत सामाजिक संस्था, शाहीन फ्रेंड सर्कल, नदाफ पिंजारी मन्सुरी जमात, पुणे एनजीओ फेडरेशन, बजमे इस्लाहा, इंडियन मुस्लिम फ्रंट, बजमे रेहेबर, फैजाने रजा, कोंढवा सोशल फाउंडेशन, होकर संघटना, शेरे हिंद फौंडेशन, अल कुरेशी यंग सर्कल,

इत्यादी संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहुन स्वतः बंदचे मुख्य आयोजकांना पत्र दिल्याची माहीती मिळाली.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular