ताज्या घडामोडीपुणे

अखेर इनामदाराच्या शाळेने भरले लाखो रुपये प्रॉपर्टी टॅक्स.

Advertisement

(Property tax) 2017 पर्यंत काही हजारांत प्रोपर्टी टॅक्स भरणारे आता भरताहेत लाखो रुपये टॅक्स.

(Property tax) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी :

पुणे शहरातील हडपसर सय्यदनगर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टद्वारे काही शाळा चालविल्या जात असुन

सदरील बांधकाम केलेल्या इमारतींचे प्रॉपर्टी टॅक्स नियमाप्रमाने भरणे बंधनकारक असताना

सदरील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टकडून प्रामाणिकपणे प्रॉपर्टी ची माहिती प्रॉपर्टी टॅक्स विभागाला देण्यास कानाडोळा केला जात होता.

millions-of-rupees-property-tax-paid-by-inamdars-school

त्यामुळे 4 मजली इमारतीला काही हजार रुपये प्रॉपर्टी टॅक्स येत होते.

तर सदरील ट्रस्टकडून बिनधास्त पणे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात होता.

त्या संदर्भात पुणे महानगर पालिकेला लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती.

त्या तक्रारची दखल घेत कर संकलन कर विभागाचे उपायुक्त विलास कानडे यांनी सदरील मालमत्ता तपासणी करण्याचे आदेश पारित केले होते.

त्यावेळी सदरील ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शफि इनामदार यांनी विरोध करत अधिका-यांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता असे नाव न सांगण्याच्या अटिवर अधिका-याने सांगितले.

Advertisement

परंतु त्याच्या दबावाखाली न येता पुणे महानगर पालिकेतील अधिका-यांनी गुलाम अली नगर येथील आयडियल इंग्लिश स्कूलची ४ मजली इमारतीची तपासणी करून नियमानुसार टॅक्स जोडला.

त्यामुळे काही हजारांत प्रॉपर्टी टॅक्स भरणा-यांना लाखो रुपये टॅक्स भरावे लागत आहे .

सदरिल ट्रस्ट ने जानेवारी 2021 मध्ये एकाच दीवसात 15 लाख रुपयापेक्षा जास्त प्रोपर्टी टॅक्स भरले असुन

मे 2021 व जुन 2021मध्ये 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरल्याची माहीती मिळाली.

याच ट्रस्ट च्या इतर शाळेच्या जागेचे एकाच दिवसात 26 लाख रुपयांपेक्षा जास्त प्रोपर्टी टॅक्स भरल्याची ही माहीती मिळाली आहे.

तसेच या प्रोपर्टीची 8 लाख 24 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम थकीत असल्याची ही माहिती मिळाली.

या प्रोपर्टी टॅक्स चोरांकडुन पुणे मनपाला 2017 नंतर 45 लाख रूपयांपेक्षा जास्त प्रोपर्टी टॅक्स मिळाला आहे.

जर या टॅक्स चोरांच्या चोरीची तक्रारच केली नसती तर यांची चोरी उघडच झाली नसती ,व पुणे मनपाला लाखो रुपये टॅक्स मिळाले असते का ?.

जर शाळा व शाळा प्रशासनच प्रोपर्टी टॅक्स चोरत असेल तर विद्यार्थ्यांनी यांच्या पासुन लांबच राहिलेले बरे.

प्रोपर्टी टॅक्स चोरी करणाऱ्या चोरांची माहीती देण्याचे अपिल प्रोपर्टी टॅक्स विभागाच्या अधिका-याने नागरिकांना केली आहे.

Share Now