Homeताज्या घडामोडीपॉर्न व्हिडिओ दाखवून पत्नी सोबत अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा...

पॉर्न व्हिडिओ दाखवून पत्नी सोबत अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Sajag Nagrikk Times: पुणे:

पत्नी सोबत अनैसर्गिक कृत्य करून मानसिक , शारीरिक , आर्थिक छळ केल्याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

आरोपीने पिडित महिला सोबत ओळख निर्माण करुन दिनांक १० जुलै २०२२ रोजी लग्न केले .

लग्नानंतर पिडीत महिला आरोपीचे घरी नांदण्यासाठी गेली असता सुरुवाती पासून आरोपीने महिलेचा मानसिक , शारिरीक , आर्थिक छळ करण्यास सुरुवात केली.

तसेच तुझ्या पहिल्या पतीकडून पैसे घेवून ये नाहीतर तुला घटस्फोट देईल अश्या धमक्या देवू लागला .

पिडीत महिलेने आरोपीला मी पैसे आणणार नाही असे बोलले असता आरोपीने फिर्यादीला बेदम मारहाण केली .

त्याबाबत पिडीत महिलेने मोहम्मदवाडी पोलिस चौकीमध्ये पती विरूद्ध १ ऑगस्ट २०२२ रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता .

या गोष्टीचा राग येवून पतीने रात्रीचे वेळेस पिडीत महिलेच्या इच्छा नसताना देखील आरोपी हा पिडीत महिलेला मोबाईल मध्ये व्हिडिओ दाखवून जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करीत होता .

हे घाणेरडे कृत्य केल्यामुळे पिडीत महिला वारंवार आजारी पडत होती तरी देखील आरोपी हा पिडीते सोबत जबरदस्तीने कृत्य करीत होता .

तसेच पिडीतेने नकार दिल्याने आरोपी हा तलाक देण्याच्या धमक्या देवून वारंवार आरोपी हा महीले सोबत अनैसर्गिक कृत्य करीत असे ,

परत पिडीत महिलेला मारहाण केली म्हणून पिडीत महिलेने १०० नंबर वरती पोलिसांना फोन केला असता पोलीस घरी आल्यावर आरोपी हा पिडीत महिलेला सोडून पळून गेला .

सुरुवातीला पोलिसांनी पिडीत महिलेच्या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून पिडीत महिलेने अॅड . साजिद ब.शाह , अॅड . हबीब खान , अॅड . अक्रम बेपारी यांच्या मार्फत वानवडी पोलिस ठाणे पोलिस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रारी दिल्या होत्या त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरोधात भा.द.वि कलम ३७७ , ४ ९ ८ ए , ३२३ , ५०४ , ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे . अँड . साजिद ब . शाह , अॅड . हबीब खान , अॅड . अक्रम बेपारी हे काम पाहत आहेत .

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular