पालखीतील वारकरी बांधवां सोबत ईद मिलन कार्यक्रम संपन्न.मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्ट
Rasta peth pune :पालखीतील वारकरी बांधवांचे मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टने ईद मिलन कार्यक्रमाधून स्वागत केले .
सोमवार पेठमधील समर्थ व्यायाम मंदिरमध्ये झालेल्या या कार्यक्रमास मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष मुस्ताक पटेल ,
सचिव श्रीरंग हुलावळे ,ऍड. मारूख पटेल , डॉ. मिलिंद भोई , अमानुल्ला खान , लतीफ मगदूम , कांता येळवंडे , अजीम गुडाकूवाला , ऍड. ए. रेहमान ,
आय टी शेख , चेतन शर्मा ,अक्रम शेख , हाजी इकबाल तांबोळी , अयाज शेख , वैशाली पाटील , संजय सरवदे ,
शब्बीर मुजाहिद ,मुकेश खेतान , संजय रणधीर आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीमधील ह. भ. प. प्रकाश करंजीकर ,
ह. भ. प. प्रकाश किर्दत , ह. भ. प. शारदा बालवडकर, ह. भ. प. पांडुरंग येळवंडे व अन्य वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे आयोजन मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष मुस्ताक पटेल ,समर्थ स्टॉलधारक संघटनेचे सचिव श्रीरंग हुलावळे ,शाहिद इनामदार ,
मुख्तार पटेल यांनी आयोजन केले होते . यावेळी सर्वानी शिरकुर्म्याचा आस्वाद घेतला .
हे पण पहा:येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे पोलीस उपनिरीक्षकावर गोळीबार
Rasta peth pune येथे यावेळी मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष मुस्ताक पटेल यांनी सांगितले कि , गेली २५ वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवतो .
वारकरी बांधवाना चहा वाटप , आरोग्य शिबीर व फराळ दिला जातो . अशा कार्यक्रमामधून माणसे एकमेकांना जोडून समाजामध्ये माणुसकी निर्माण करणे
हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे . यावेळी अमानुल्ला खान , डॉ. मिलिंद भोई ,ऍड. ए. रेहमान आदींनी मनोगते व्यक्त केली .
हे पण पहा:पुणेकरांनी वारकरी बांधवानसाठी घेतले विविध उपक्रम