भारती मंगेशकर,राधा मंगेशकर यांच्या ‘मिसेस’बी’ज या कप केक शॉपीला आशा भोसले यांची भेट(Asha Bhosle visit Cupcake shop)
Asha Bhosle visit Cupcake shop : पुणे :ख्यातनाम पार्श्वगायिका श्रीमती आशा भोसले यांनी नुकतीच पुण्यातील ‘मिसेस बी ‘ज ‘ या कप केक शॉपी ला भेट दिली .
देशोदेशीची खाद्यसंस्कृती आणि पाककौशल्यात रुची घेणाऱ्या आशाताईंना ‘कप केक ‘चे वैविध्य आणि माधुर्य आवडले !
त्यांनी वेगवेगळ्या स्वादांच्या कप केक चा आस्वाद घेतला आणि काही सोबतही घेतले .एरंडवणे येथील मंगेशकर हॉस्पिटल रस्त्यावरील
‘मिसेस बी ‘ज ‘ ही Cupcake shop सौ. भारती मंगेशकर आणि राधा मंगेशकर यांनी सुरु केली आहे ,
सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांनी त्याचे उद्घाटन केले होते .नुकत्याच पुण्यात आलेल्या आशा भोसले यांनी १७ जुलै रोजी कप केक शॉपी ला भेट दिली .
आणि येथे उपलब्ध विविध आकर्षक चवीच्या कप केक ,टी केक्स ,पेस्ट्रीज ,सेलिब्रेशन केक ,
कुकीज फ्रेश ब्रेड आणि सँडविचेस या प्रकारांची माहिती घेतली .निर्मितीप्रक्रिया ,लागणारे घटक यांचीही माहिती घेतली .
तेथील कर्मचाऱ्यांशी परिचय करून घेतला,थोडा संवाद साधला. सौ. भारती मंगेशकर यांनी स्वागत केले .
तेथील कर्मचाऱ्यांशी परिचय करून घेतला,थोडा संवाद साधला. सौ. भारती मंगेशकर यांनी स्वागत केले .
अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तर्फे चांबळी येथे फळझाडांची लागवड