Homeताज्या घडामोडीभारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट(International placement)

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट(International placement)

International placement : भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट 

International placement for the student of Bharti University Engineering College

सजग नगरिकटाइम्स : पुणे :’भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय’ चा विद्यार्थी राहुल मैनी  याला ‘एमिरेट’ या दुबईच्या कंपनीत (International placement ) 

आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट मिळाली असल्याची माहिती प्राचार्य  डॉ.  आनंद  भालेराव  यांनी  पत्रकाद्वारे   दिली.या प्लेसमेंट नुसार त्याला वार्षिक ३४ लाख रुपयांचे पॅकेज मिळणार आहे .

राहुल मैनी  हा आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट मिळविणारा या महाविद्यालयाच्या ‘ट्रेनिंग  अँड प्लेसमेंट ‘ सेलचा पहिला विद्यार्थी ठरला आहे . 

या प्लेसमेंटसाठी निवड होण्यासाठी त्याला प्रवेश परीक्षा  आणि त्री -स्तरीय मुलाखतींच्या फेऱ्यांमधून पुढे जावे लागले .

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची कौशल्ये वृद्धिंगत करण्याबरोबरच त्यांना रोजगार संधींसाठी सक्षम करण्यासाठी महाविद्यालय विविध प्रशिक्षण उपक्रमांद्वारे परिश्रम घेते

त्याचा विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यास फायदा होत असल्याचे डॉ . आनंद भालेराव यांनी सांगितले . 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular