राज्य माहिती आयुक्तांनी टोचले पोलीसांचे कान

पोलीस ठाण्यातील सीसीटिवी फुटेज देण्यास दिला जातो नकार
सजग नागरीक टाइम्स प्रतिनिधी पुणे, अजहर खान
माहिती अधिकार कायद्याला 13 वर्षे पूर्ण झाली असली तरी आज अनेक ठिकाणी काहीना काही कारणाने माहिती नाकारण्याचेच प्रमाण जास्त झाले आहे ,
त्यात पुणे पोलीस हि मागे नाही एखाद्या नागरिकांने तक्रार/फिर्याद दिल्यावर त्या तक्रारीवर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आली आहे हि पोलीसांनी स्वताहून संबंधिताला कळविणे बंधनकारक असताना पुणे पोलीसांकडून कुचराई केली जाते
मग तक्रारदाराने माहिती अधिकार कायद्या अन्यवे (RTI) अंतर्गत अर्ज केला कि पोलिसांच्या डोक्यात फक्त एकच कलम तेपण 8(J) 1 प्रमाणे तपास चालू असल्याने माहिती देता येत नाही,
प्रकरण न्याय प्रविष्ट आहे,थडपार्टी असल्याने माहिती देता येत नाही , असे अनेक कारणे सांगून माहिती नाकारण्याचेच प्रमाण वाढले आहे ,
व ते प्रकरणे राज्य माहिती आयुक्त पुणे यांच्याकडे दाखल झाल्याने राज्य माहिती आयुक्तांनी माहिती न देणा-या पोलीसांचे चांगलेच कान टोचले आहे,
व तसेच कार्यवाही ची माहिती तक्रारदाराला देण्यात यावी असे हि आदेशात म्हणटले आहे,
या बाबतीत कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त महासंचालक मिंलीद भारंबे यांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना (State Information Commissioner )राज्य माहिती आयोगाने दिलेल्या सुचनांची माहिती परिपत्रक काढून ठाण्यांना दिली आहे,
तसेच सदरील आदेशाची अंमलबजावणी किती तत्परतेने होते हे पाहवे लागेल.