नैवेद्य व Puran-poli गोळा करून वंचित व गरीबांना 1000 पोळ्याचे व नैवेद्य चे वाटप


(holi) होळीत दुष्ट विचार टाकून जाळा ! (Puran-poli)पुरणपोळी नैवेद्य जाळण्या ऐवजी भुकेलेल्या जीवाला द्या!

महाराष्ट्रतील पहिला उपक्रम दोन दिवस आगोदर जनजागृती करूंन होळीचा ठिकाणी जाऊन नैवेद्य व (Puran-poli) पुरणपोळी गोळा करून वंचित व गरीबांना 1000पोळ्याचे व नैवेद्य चे संकलन

महाराष्ट्रात होळीच्या (holi)अग्नीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे.तसेच समस्त समुदाय होळीची विधियुक्त पूजन करतो.होळी समोर गार्‍हाणे, नवस बोलण्याची परंपरा आहे.

human-rights-protection-and-awareness-distribution-puran-poli-holi


(holi) आग्नीत (Puran-poli) पुरणपोळीचा नैवेद्य जाळण्याऐवजी अंःध, गरीब, गरजु, अनाथ मुलांच्या जीवनातही आनंद निर्माण होवून आपले ही कोणीतरी आहे ही भावना त्यांच्या विषयी असावी व होळी हा रंगांचा सण आहे म्हणुन  त्यांच्या जीवणात उत्सवाचे रंग भरावेत तसेच भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्याकरीता (holi) होळी पेटवली जाते. मात्र, असे करताना अनेक वृक्षांचा नाहक बळी दिला जातो. जगभरात पर्यावरण बचावासाठी प्रयत्न सुरू असतानाच होळीसाठी झाडांची सर्रासपणे कत्तल केली जाते.

विशेष म्हणजे यंदा जागतिक वनदिनीच होळी साजरी करीत आहोत. एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश दिला जात असताना जागतिक वनदिनीच हजारो वृक्षांची कत्तल होतांना दिसत आहे. होळीसाठी झाडे तोडण्याऐवजी केरकचरा व अन्य टाकाऊ पदार्थांची होळी करावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्या बरोबरच हा रंगांचा सण आहे परंतु सावधानता पाळणे अधिक गरजेचे आहे.

human-rights-protection-and-awareness-distribution-puran-poli-holi

कारण आजकाल भेसळयुक्त रंगामुळे खूप शारीरिक नुकसानाना सामोरे जावे लागते.चुकीच्या रंगामुळे डोळ्यांना हानी पोहचू शकते त्यामुळे असे रसायन मिसळले रंग वापरू नये याची जनजागृती करण्याच्या हेतूने होळीत दुष्ट विचार टाकून जाळा होळीत पुरणपोळी नैवेद्य जाळण्या ऐवजी भुकेल्या जीवाला द्या हा प्रवाह विरोधी विचाराने होळी सण साजरा करण्याचे मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतिने ठरविण्यात आले.

नवी सांगवीतील मंडळाच्या व सोसायटीच्या होळीचा ठिकाणी जाऊन नागरिकांना आव्हान केले की नैवेद्य व नारळ होळीत न वाढवता आमच्या कडे द्या या आव्हानाला  नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला यातून जवळपास दिड हजार पेक्षा जास्त पुरणपोळी जमा झाल्या

  पिंपळे गुरव येथील ममता अंःध कल्याण केंद्रातील 35 अःध मूलांना (Puran-poli) पूरणपोळी व दूध देऊन  जेवण देण्यात आले. ईतर निराधार  व गरीबांना जेवण देण्यात आले. अंध कल्यान केंद्रातील काही मुले ही   यूपीएससी, एपीएमसी, व बँकींगचा  आभ्यास करत आहेत पुरणपोळीचा जेवण झाल्यावर त्यांनी या अनोख्या उपक्रमाचे स्वागत केले यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहुन हा  उपक्रम राबविण्याचा हेतू सफल झाल्याचे समाधान  शहराध्यक्ष आन्ना जोगदंड यांनी व्यक्त केले.

आळंदी   येथील श्री ज्ञानेशा रेसीडेंसी सोसायटी मध्ये आळंदी शहर सचिव रवी बेनकी,दशरथ कांबळे व सभासदांनी हाच उपक्रम राबवला. या वेळी संस्था अध्यक्ष विकास कुचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम राबविण्यात आला .

नागरीकांचा मिळालेला प्रतिसाद गरजूच्या चेहऱ्यावरील समाधान बघुन हा उपक्रम संपुर्ण महाराष्ट्रात अनेक सामाजिक संस्थाने राबवावा यासाठी जनजागृती करणार असल्याचे आण्णा जोगदंड यांनी सांगितले.

यावेळी आन्ना जोगदंड, गजानन धाराशिवकर,पश्चिम महाराष्ट्र  महिला अध्यक्ष सौ संगिता जोगदंड, सूर्वणयुग मंडळाचे सचिव संदीप दरेकर मुळशी महिला अध्यक्षा मीनाताई करंजवने, यूवक अध्यक्ष धनराजसिंग चौधरी ,अरविंद मांगले,मूलीधर दळवी, पंडित वनसकर, विकास शहाणे,बदाम कांबळे, सा.का.आभिजित टाक सतिष ईतापे   ईश्वर सोनोने ,हनुमंत पंडित इत्यादी नी सहभाग नोंदवला  .

Leave a Reply