Homeताज्या घडामोडीमहाराष्ट्र पोलीसांना मानवअधिकार आयोगाची नोटीस(Human Rights Commission)

महाराष्ट्र पोलीसांना मानवअधिकार आयोगाची नोटीस(Human Rights Commission)

Human Rights Commission notice to  Maharashtra police

human-rights-commission-notice-to-maharashtra-police

सजग नागरीक टाईम्स , मुंबई- माओवादी ‘थिंक टँक’ अटक प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांना मानवाधिकार आयोगानं नोटीस बजावली आहे.

 पोलिसांनी या अटकसत्रादरम्यान निर्धारित कार्यपद्धतीचं, नियमांचे योग्य पालन केले नसल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणलं आहे.

अहवालानुसार ही बाब म्हणजे त्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचंही म्हटलं आहे.

बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी मंगळवारी (28 ऑगस्ट) पहाटे हैदराबाद, मुंबई, दिल्ली, छत्तीसगड येथे छापे घातले.

या कारवाईमध्ये वारा वारा राव (हैदराबाद), वेरनोन गोन्सालविस, अरुण पाररिया (मुंबई), सुधा भारद्वाज (छत्तीसगड), गौतम नवलाखा यांच्या घरावर छापे टाकून त्यांना अटक केली. 

पुण्यातील शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर 2017 रोजी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत माओवाद्यांनी पैसे पुरविल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.

या प्रकरणी पुणे पोलिसांनी यापूर्वी परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे, अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रॉनी विल्सन आणि प्रा. शोमा सेन यांना अटक केली होती.

Human Rights Commission

त्यांच्याकडे सापडलेल्या 200 ई-मेलमध्ये या पाच जणांचा बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याचे दिसून पोलिसांनी यानंतर हैदराबाद,

मुंबई, दिल्ली तसेच छत्तीसगडमध्ये या माओवादीचे थिंक टॅक असलेल्यांची माहिती घेतली.

ते त्यांच्या घरी असल्याची माहिती झाल्यानंतर मंगळवारी 28 ऑगस्ट पहाटे एकाच वेळी किमान 5 ठिकाणी छापे घालून झडती घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते.

यांची एल्गार परिषद अथवा कोरेगाव भीमा दंगलीशी संबंध नसून ते बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंधित असल्याचे उघड झाल्याने त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. 

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular