RTI माहिती अधिकार म्हणजे काय?
सजग नागरिक टाइम्स: हडपसर नागरिक मंच व फोश फौंडेशन यांच्या संयुक्त विद्माने काल यश रवीपार्क,हांडेवाडी रोड या सोसायटी मध्ये हडपसर च्या सर्व नागरिकांसाठी RTI माहिती अधिकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हडपसर च्या नागरिकांना RTI माहितीचा अधिकार या कायदयाची माहिती व्हावी ह्या उद्देशाने “माहिती अधिकार कार्यशाळा” काल प्रथमच हडपसर येथे आयोजित करण्यात आली होती यावेळेस परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. तन्मय कानिटकर बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी पंतप्रधान आणि दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहून झाली.सदर कार्यशाळेस मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभाग नोंदवला.
सजग च्या व्हिडीओ बातम्या पाहण्यासाठी क्लीक करा
तन्मय कानिटकर म्हणाले की RTI माहितीचा अधिकार हे लोकशाहीतील प्रभावी माध्यम आहे.याचा वापर जास्तीत जास्त नागरिकांनी करावा. माहिती अधीकार बद्दल माहिती अधिकार म्हणजे काय ? तो कसा वापरावा , त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते ? अश्या खूप साऱ्या प्रश्नांवर उत्तरे ही देण्यात आली.आपण कर भरतो पण त्या बदल्यात आपल्याला मिळणाऱ्या सुविधा ह्या न मिळाल्याने आपनास अनेक गोष्टींचा त्रास होतो.
ह्यासाठी अनेक वेळा तक्रार करूनही न्याय मिळत नाही ,RTI त्यासाठी माहिती अधिकार वापर करून आपण समस्या सोडवू शकतो. असे या वेळी त्यांनी नमूद केले.भारतीय नागरिक हेच भारताचे खरे विश्वस्त असून प्रशासन व लोकप्रतिनिधी हे आपले कर्मचारी आहेत.त्यांनी योग्य पद्धतीने व पारदर्शकपणे काम करण्यासाठी RTI माहिती आधिकार कायदा आहे , असे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव माने यांनी केले तर आभार अजिंक्य ससाणे यांनी मानले. कार्यशाळाचे आयोजन हडपसर नागरिक मंच आणि फोश फौंडेशनचे मुकेश वाडकर , महेंद्र बनकर , अनिकेत राठी , मंदार घुले,स्मिता गायकवाड ,प्रा.अमोल तोष्णीवाल यांनी केले .
हे पण पहा : राष्ट्रीय सुरक्षा साक्षरता साक्षरता अभियान अंतर्गत स्प्लेश एन डॅश कार्यक्रम