काळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

Kalepadal railway gate : लवकरात लवकर काम पूर्ण करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा अझरुद्दीन सय्यद यांनी दिला आहे.

Kalepadal railway gate : सजग नागरिक टाइम्स :

(प्रतिनिधी- हडपसर) पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील सय्यदनगर व काळेपडळ येथील रेल्वे क्रॉसिंग भुयारी मार्गाचे काम करण्यात आले आहे.

सय्यद नगर रेल्वे क्रॉसिंग भुयारी मार्ग नागरिकांसाठी सुरु करण्यात आला आहे.

परंतु काळेपडल रेल्वे क्रॉसिंग भुयारी मार्गाचे काम अजून पूर्ण झाले नसल्याने परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Advertisement

वाचा :> कर्जदारांकडून कर्जाच्या व्याजावर व्याज संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली

भुयारी मार्ग सुरु नसल्याने जुन्या रेल्वे गेट वरून वाहतूक सुरु आहे परंतु अरुंद रास्ता असल्याने दर रोज ट्राफिक जॅम होत आहे.

तासंतास वाहनांची रांग लागत आहे. दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडी मुळे नागरिकांचे हाल होत आहे.

कित्येक वर्षांपासून या रेल्वे मार्गावरील भुयारी मार्गाचे काम रखडलेले होते.

Advertisement

मार्च २०२० मध्ये सदरील भुयारी मार्गाचे काम पूर्ण होईल असे आश्वासन महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते.

Advertisement

वाचा > पोलीसाने महिलेला गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार, FIR दाखल

मागील ४ महिन्या पूर्वी सय्यदनगर रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे काम पूर्ण करून सदरील मार्ग वाहतुकीसाठी सुरु करण्यात आलेला आहे ,

परंतु याच रेल्वे मार्गावरील काळेपडल रेल्वे गेट जवळ असलेल्या भुयारी मार्गाचे काम अजून पूर्ण झालेले नाही या रखडलेल्या कामा मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Advertisement

या संबधी हडपसर येथील मनसे चे अझरुद्दीन सय्यद व सनी लांडगे यांनी काळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून सदरील मार्ग वाहतुकीसाठी सुरु करण्यात यावे या मागणी चे निवेदन मुख्य अभियंता महानगरपालिका पुणे यांना दिले.

लवकरात लवकर काम पूर्ण करा अन्यथा मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असा इशारा अझरुद्दीन सय्यद यांनी दिला आहे.

वाचा > मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व योजनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी

Advertisement

One thought on “काळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,

Comments are closed.