ताज्या घडामोडी

‘कचरा स्वच्छ वाल्यांना द्या’, म्हटल्यामुळे सफाई कर्मचाऱ्याला बेदम मारहाण.

Advertisement

पुणे : स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कचरा गोळा करणाऱ्या महिलांना तुमचा कचरा द्या, असे म्हटल्यामुळे मनपा सफाई कर्मचाऱ्याला दुकानदाराच्या नोकराने रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याची घटना टिंबर मार्केट परिसरात घडली आहे.

याप्रकरणी फिर्यादीची तक्रार खडक पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यात आली असून संबंधित आरोपीवर सरकारी कामात अडथळा व इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
फिर्यादी संतोष अरुण जाधव (वय ३९) राहणार ५९८ गंज पेठ हा भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.

सकाळी ९:३० वा. सुमारास हद्दीत स्वछतेचे काम करत असताना टिंबर मार्केट येथिल सावित्रीबाई फुले स्मारकाच्या समोरील परिसरात राजदीप हार्डवेअर दुकानाच्या पावत्या असलेल्या कचरा आढळून आला.

Advertisement

यावेळी कर्मचाऱ्याने दुकानदाराच्या नोकराला कचरा स्मारकासमोर टाकायचा नाही. हा कचरा स्वच्छवाल्यांना द्या. असे सांगून कर्मचारी गाडा घेऊन शिवमंदिर परिसरात निघून गेला.

पुढे सकाळी १०:०० च्या सुमारास राजदीप हार्डवेअर मध्ये काम करणारा नोकर दुचाकीवर येऊन कर्मचाऱ्याला भेटून म्हणाला की, तूने मेरे दुकान के सामने कचरा क्यू डाला, यहा से कचरा उठा असे म्हणत आई वरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

‘तेरी कचरा उठाने की औकात है’, तू कचरा उठा. अशी दमदाटी सफाई कर्मचाऱ्याला केली. यावेळी तू मला शिवीगाळ का करतो अशी विचारणा फिर्यादीने केल्यावर आरोपी नोकरदाराने ड्रेसचे कॉलर पकडत त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारले.

प्रसंगी स्वच्छ सर्वेक्षण मध्ये काम करणाऱ्या महिला संगीता मोहिते यांनी कर्मचाऱ्याचा अधिक मारहाणी पासून बचाव केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक करत आहे.

Share Now