ताज्या घडामोडी

नविन लाईट मिटर घेवून देतो असे सांगून पैश्यांची फसवणुक करून फरार झालेला आरोपी काही तासात गजाआड

Advertisement

युनिट -१ , गुन्हे शाखेची कामगिरी

नविन लाईट मिटर घेवून देतो असे सांगून त्याबदल्यात रक्कम स्विकारून लाईटर घेवून दिले नाही म्हणुन रज्जाक इसाक सय्यद (रा महात्मा फुले पेठ , पुणे) यांनी नितीन रमेश नाईक (वय ४ ९ वर्ष रा महात्मा फुले पेठ , पुणे) याच्या विरूध्द कोंढवा पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने दिनांक १०/११/२०२२ रोजी गु र नं १११२/२२ भादवि कलम ४२० , ४०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

गुन्हे शाखा युनिट -१ चे अधिकारी व अंमलदार दाखल गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेत असताना युनिट १ कडील पोलीस अंमलदार यांना त्यांच्या बातमीदारामार्फत काही तासातच खबर मिळाली की , संदर्भीय दाखल गुन्हयातील फरार आरोपी नितीन रमेश नाईक वय ४ ९ वर्ष रा महात्मा फुले पेठ , पुणे . हा हत्ती गणपती सदाशिव पेठ , पुणे येथे येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने हत्ती गणपती सदाशिव पेठ , पुणे येथून त्यास ताब्यात घेवून पुढील कार्यवाही साठी कोंढवा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे . –

Advertisement

सदरची कामगिरी अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त पुणे शहर , संदीप कर्णिक पोलीस सह आयुक्त पुणे शहर , रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , पुणे शहर , श्रीनिवास घाडगे पोलीस उप – आयुक्त , गुन्हे , पुणे , गजानन टोम्पे , सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे – १ , पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट -१ कडील पोलीस निरीक्षक संदीप भोसले , सहा पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर , पोलीस अंमलदार अजय थोरात , अमोल पवार व तुषार माळवदकर यांनी केली .

Share Now