उध्दव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

Uddhav thackeray : उध्दव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

shiv-sena-chief-uddhav-thackeray-take-oath-as-chief-minister-of-maharashtra2019

Uddhav thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या

 ‘महाराष्ट्र विकास आघाडी ‘च्या सरकारचा शपथविधी सोहळा आज शिवाजी पार्कवर पार पडला.

महाराष्ट्रचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनी वेगळ्या पद्दतीने शपथ घेतली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आणि माझे आई वडीलांना स्मरून ‘मी उद्धव बाळासाहेब ठाकरे’शपथ घेत आहे अशा शब्दात शपथ घेतली.

Advertisement

uddhav thackeray यांच्यानंतर एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांनी शपथ घेतली.

या शपथविधीला देशभरातील नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॉंग्रेस नेते अहमद पटेल,

कपिल सिब्बल, राज ठाकरे , मल्लिकार्जुन खरगे , चंद्रकांत पाटील, आदींसह राज्यातील दिग्गज नेते उपस्थित होते.

shiv-sena-chief-uddhav-thackeray-take-oath-as-chief-minister-of-maharashtra2019

शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी ही शपथ उद्धव ठाकरेंना दिली.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर ठाकरेंनी सरकार स्थापन केलं. त्यानंतर जमलेल्या सगळ्या उपस्थितांना उद्धव ठाकरेंयांनी दंडवतही घातला.

त्यानंतर एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई या शिवसेनेच्या दोन नेत्यांनीही शपथ घेतली.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनीही शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे व बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन शपथ घेतली.

तर सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन शपथ घेतली. जयंत पाटील यांनी वडिलांसोबत आईचंही नाव घेऊन शपथ घेतली.

Advertisement

तसंच शरद पवारांचंही नाव त्यांनी शपथ घेताना घेतलं. तर छगन भुजबळ यांनी महात्मा फुले, सावित्री फुले, शाहू महाराज,

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला स्मरुन तसंच शरद पवारांचं नाव घेत त्यांनीही शपथ घेतली. 

त्यांच्यासोबतच बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली.’हीच ती वेळ’ असा नारा देत शिवसेनेने निवडणूक प्रचार केला.

शिवसेना आणि भाजपा यांची युती होती. लोकांनी कौलही महायुतीलाच दिला होता.

Advertisement

मात्र निवडणूक निकालानंतर भाजपा आणि शिवसेना यांचं मुख्यमंत्रीपदावरुन झालेलं भांडण आणि त्यानंतर झालेला घटस्फोट हा महाराष्ट्राने पाहिला.

त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाविकास आघाडी स्थापन केली.

महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम

शिक्षण

राज्यातील शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार

Advertisement

राज्यातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आणि आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्जाची सुविधा देणार!

बेरोजगारी

राज्यातील बेरोजगारांसाठी त्वरित रखडलेल्या सरकारी नोकऱ्यांची प्रक्रिया मार्गी लावणार

सुशिक्षित तरुण बेरोजगारांना शिष्यवृत्ती सुविधा राबवणार

महाराष्ट्रातील नोकऱ्यांमध्ये ८०% आरक्षण हे स्थानिकांसाठी मिळावं याकरिता राज्यात नवा कायदा अमलात आणणार

Advertisement
महिला

महिला सुरक्षेचा मुद्दा हा या सरकारचा सर्वात महत्वाचा घटक असेल

Advertisement

आर्थिकरित्या मागास कुटुंबातील विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाची सुविधा

नोकरदार तरुण युवतींसाठी तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह उभारणार

अंगणवाडी सेविकांच्या मासिक भत्यात अथवा मानधनात वाढ करणार आणि त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवणार

Advertisement

– महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत महिला बचत गटांच्या सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार

शेतकरी

अवकाळी पावसामुळे दुष्काळाने ग्रासलेल्या भागांमध्ये जनतेच्या सेवेसाठी तातडीने आवश्यक ते सहकार्य करणार

राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमुक्त करणार

दुष्काळात पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मिळावा यासाठी संबंधीत यंत्रणेत आवश्यक ते बदल करणार

Advertisement

पिकाचा हमीभाव ठरवण्यासाठी आवश्यक त्या तरतुदी अमलात आणणार

दुष्काळग्रस्त भागात पाण्यासाठी शाश्वत जलसाठा मोहीम राबवणार

शहरी विकास

शहरी भागातील रस्तेबांधणीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंमलात आणणार तसेच नगरपरिषद,

नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या रस्त्यांच्या सुधारणीसाठी अथवा डागडुजीसाठी विशेष आर्थिक अनुदानाची तरतूद करणार

Advertisement

मुंबईसह सबंध महाराष्ट्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत येणाऱ्या गोरगरिबांना ५०० चौ.फूट घरे मोफत दिली जाणार

उद्योग

महाराष्ट्रातील गुंतवणूक आणि नवीन उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष सवलती राबवणार तसंच उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठीची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ आणि सरलीकृत करणार

महाराष्ट्रात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या उद्योगाना चालना मिळावी यासाठी त्याच्या योजनांमध्ये आवश्यक सुधारणा करणार

Advertisement

पर्यटनकला आणि संस्कृती

महाराष्ट्रातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सर्व ठिकाणी पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार

  • सामाजिक न्याय

महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि जमाती,इतर मागासवर्गीय, धनगर,बलुतेदार आदी जनतेच्या अन्न,

वस्त्र,निवारा,शिक्षण,आरोग्य आणि रोजगार या मूलभूत गरजांच्या सोयीसुविधा संविधानातील तरतुदींप्रमाणे अग्रक्रमाने पुरवणार

Advertisement

महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक वर्गातील सामाजिक,शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार तसंच त्यांच्या सुरक्षेसाठीही विशेष काळजी घेणार

इतर महत्वाच्या तरतुदी

जेष्ठ नागरिकांच्या बाबतीत विशेष सुविधा राबवणार

अन्न आणि औषध या बाबतीतल्या सुरक्षेच्या प्रश्नी दुर्लक्ष कारणाऱ्यांविरुद्ध किंवा नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कडक शिक्षेची तरतूद करणार

Advertisement

सामान्य नागरिकांना केवळ दहा रुपयात स्वच्छ आणि परवडणारं जेवण/अन्न पुरवणार

या किमान समान कार्यक्रमाची व्यवस्थित अंमलबजावणी करण्यासाठी अथवा सर्वांमध्ये समन्वय साधण्यासाठी

महाविकासआघाडीच्या सर्व पक्ष सदस्यांची एक आणि राज्य कॅबिनेटची एक अशा दोन स्वतंत्र समन्वय समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.

Advertisement