Appzen Company|नव्या अत्याधुनिक सोयींनी युक्त केंद्राच्या माध्यमातून एआय प्लॅटफॉर्मला अधिक उत्तम करण्याचा प्रयत्न
Appzen Company |पुणे :अत्याधुनिक फायनान्स टीम्ससाठी उपयुक्त असा जगातील आघाडीचा एआय प्लॅटफॉर्म ॲपझेनने नुकतेच पुण्यात विकसन केंद्र सुरू केले.
अत्याधुनिक सोयींनी युक्त अशा या केंद्राचे उदघाटन ॲपझेनचे सीएफओ नरेश बन्सल आणि भारतातील ऑपरेशन्सचे प्रमुख मंदार मुणगेकर यांनी केले.
कंपनीला पुण्यातील कौशल्यवान कर्मचाऱ्यांना सामावून घ्यायचे असून,
नव्या केंद्राच्या माध्यमातून आतंरराष्ट्रीय स्तरावरील पोहोच वाढणार असून त्याच्या माध्यमातून आपला एआय प्लॅटफॉर्म अधिक उत्तम करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने पुण्यात मुख्यालय ठेवून भारतात व्यवसाय करणार असल्याचे जाहीर केले.
कोट्यु मॅनेजमेंटच्या माध्यमातून आर्थिक गुंतवणूक मिळवत सर्वांत वेगाने प्रगती करणाऱ्या स्टार्टअपपैकी
एक असलेल्या ॲपझेनने 50 मिलियन अमेरिकी डॉलरची सीरिज सी गुंतवणूक उभी केली आहे.
कोट्युसोबतच रेडपॉइंट व्हेंचर्स आणि लाइटस्पीड व्हेंचर पार्टनर्स या आधीच्या गुंतवणुकदारांची गुंतवणूक धरल्यास कंपनीने आजपर्यंत 100 मिलियन अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक उभारली आहे.
एआयचा उपयोग करून आपोआप खर्चाचे हिशेब करणारी सेवा हे कंपनीचे सर्वांत मोठे उत्पादन आहे.
खर्चाची परवानगी, कंपनीच्या धोरणाशी जोडून खर्च कमी करण्यासंबंधीच्या सूचना देणे आणि सर्व प्रक्रिया सुरळीत करणे
या सेवा देणारा एआय प्लॅटफॉर्म तयार करून अत्याधुनिक फायनान्स टीम्सना मदत करण्यावर कंपनी सध्या काम करत आहे.
ॲपझेनने नुकतीच 1500 ग्राहकसंख्येचा टप्पा पार केली असून, त्यापैकी 25 टक्के फॉर्च्युन 500 कंपन्या आहेत ज्यात ॲमेझॉन,
एनव्हिडिया, सेल्सफोर्स, व्हेरिझॉन तसंच अमेरिकेतील सर्वोत्तम 10 पैकी तीन बँका आणि सर्वोत्तम 10 माध्यम कंपन्यांपैकी चार कंपन्यांचा समावेश आहे.
तसेच या ग्राहकांमध्ये सर्वोत्तम 10 फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी तीन,
सर्वोत्तम पाच हवाईवाहतूक कंपन्यांपैकी दोन आणि अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांचा समावेश आहे.
या प्रगतीबद्दल भारतातील ऑपरेशन्सचे प्रमुख मंदार मुणगेकर म्हणाले,
‘ डाटा सायन्स क्षेत्रातील आमचं प्रचंड टॅक्टिक ज्ञान वापरून आमची वाढ स्मार्ट व्हावी अशी आमची अपेक्षा आहे.
आमच्या जागतिक स्तरावरील वाढत्या ग्राहकांच्या दृष्टिने उच्च दर्जाचे इंजिनीअरिंग आणि डाटा सायन्स बॅकग्राउंडमधील कौशल्याचा साठा तयार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.’
ॲपझेनचे सीएफओ नरेश बन्सल म्हणाले, ‘ आम्ही आघाडीचा एआय प्लॅटफॉर्म आहोत
आणि त्यामुळेच आम्हाला विविध कौशल्य असलेले आणि विविध पृष्ठभुमीतून आलेल्या कर्मचाऱ्यांची गरज आहे
जेणेकरून आमचे ऑफिस ही अत्यंत वैविध्यपूर्ण अशी जागा ठरेल.
आम्ही पुण्यात व्यवसाय विकसित करण्यासाठी आणि गुंतवणूक आणण्यासाठी वचनबद्ध आहोत
आणि अनेक आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांसाठी माहेरघर ठरलेल्या पुण्यातील स्थानिक उमेदवारांच्या कौशल्याला आम्ही संधी देणार आहोत.