काही महिन्यापूर्वी डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर खड्डेच खड्डे : भवानी पेठेतील प्रकार,

(Bhavani Peth kadda news) निकृष्ट दर्जाचे काम केल्या प्रकरणी ठेकेदारावर कारवाई होणार का ?

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिका-यांकडून कामाची वर्क ऑर्डर दाखविण्यास टाळाटाळ,

Bhavani Peth kadda news 2020

(Bhavani Peth kadda news ) :सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे :

सध्या अवकाळी पाऊसाने थैमान घातले असून पुणे शहरातील रस्ते‌ जलमय झाले आहे.

Advertisement

पुणे महानगर पालिकेने केलेले डांबरीकरणाच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसत आहे.

तर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाने ६ महिन्यापूर्वी प्रभाग क्रमांक १९ भवानी पेठेतील अलंकार मेडीकल ते चुडामन तालीम पर्यंत रातोरात डांबरीकरण करून मोकळे झाले होते.

मागील बातमी > भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा भोंगळ कारभार , रात्री डांबरीकरण केले व सकाळी खोदले.

व डांबरीकरण करताना जे नियम पालिकेने घालून दिलेले होते ते सर्व नियम धाब्यावर बसवत डांबरीकरण केल्याची बातमी सजग नागरिक टाईम्सने प्रसिद्ध केली होती.

Advertisement

घाईघाईत केलेल्या कामाचा दर्जा आज पहायला मिळाला आहे. अलंकार मेडीकल समोरच रस्त्यावर खड्डे झाल्याने त्या खड्ड्यात पाणी साचत आहे.

त्या खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात होणे व वाहने घसरून पडत आहे. रस्त्यावर खड्डे झाल्याने व पाणी साचत असल्याने चंद्रावर आल्या सारखे वाटत आहे.

परंतु त्याच्याशी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिका-यांना काहीही देणे घेणे नाही.

संबंधित रस्त्यावर केलेल्या डांबरीकरणाबाबतीत क्षेत्रीय कार्यालयातील उपअभियंता बाळासाहेब टुले यांच्याकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता मला माहित नसल्याचे सांगून हातवर केले.

Advertisement

तर इंजिनिअर संजयकुमार शिंदे यांना वारंवार संपर्क केला असता त्यांनी फोन उचलण्याची तसदी सुध्दा घेतली नाही.

अधिका-यांच्या अश्या वागण्यामुळे ठेकेदार सुखावले आहे. हे आजचं नव्हे ही परंपरागतच चालले आहे.?

रस्त्यावर झालेले काम पारदर्शकपणे व नियमानुसार झाले आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी इंजिनिअरची असून इंजिनिअरने उंटावर बसून शेळ्या हाकल्यागत कदाचित पाहणी केली असावी?

Advertisement

म्हणून ६ महिन्यातच रस्ता उखडला आहे. तर बिल काढताना उपअभियंता यांनी ही कार्यालयात बसून बिले मंजूर केल्याचे दिसते?

उपअभियंता यांनी समक्ष कामाच्या दर्जाची पाहणी केली असती तर बिलच मंजूर केले नसते.

दोनशे ते तीनशे मिटर काम करुन २० लाख रुपयांचे बिले लाटली जात आहे.

Advertisement

विशेष म्हणजे वर्क ऑर्डर विना करण्यात आलेले डांबरीकरणाचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे जानकरांनी सांगितले.

डांबरीकरण करताना जे नियम घालण्यात येतात ते नियमच धाब्यावर बसवले जात आहे.

पुणे महानगर पालिका आयुक्तांनी स्वताहून भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील कामांची पाहणी करणे गरजेचे आहे त्या पाहणी नंतरच दुध का दुध पाणीचा पाणी होईल हे नक्कीच.

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात काही ठिकाणी कामांची वर्क ऑर्डर निघून मुददत संपली असली तरी अद्याप कामे झाली नसल्याची माहिती सजग प्रतिनिधींच्या हाती लागली आहे.

Advertisement

निकृष्ट दर्जाचे कामे करणा-या ठेकेदार व ज्युनियर इंजिनिअर व त्यांना पाठिशी घालणा-या अधिकारी यांची कडक चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

डांबरीकरण करताना चे नियम? डांबरीकरण करताना अगोदर रस्ता स्क्रॅप करणे .दीड इंच खोदाई करणे. डांबरीकरण करताना रस्त्यात येणाऱ्या डेनेज झाकणे समपातळी करणे.खडी टाकून प्लेन करणे त्या नंतर शेवटी डांबरीकरण करण्याचे नियम असताना सुद्ध्या सर्व नियमांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत.लायबलिटी पिरीयेड नुसार ठेकेदाराने रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे असताना ठेकेदारांवर अधिका-यांचा वचक नसल्याने ते ही सदरील रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहे.

वाचा > चोराशी रोमॅन्टिक चॅटिंग करून प्रेमात पाडले ,व नंतर त्याला तुरुंगात पाठविले

Advertisement
Support our journalism - Support Sajag Nagrikk Times

2 thoughts on “काही महिन्यापूर्वी डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर खड्डेच खड्डे : भवानी पेठेतील प्रकार,

Comments are closed.