Homeताज्या घडामोडीनायडू हॉस्पिटल स्थलांतर प्रस्ताव रद्द करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

नायडू हॉस्पिटल स्थलांतर प्रस्ताव रद्द करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

Naidu Hospital news : नायडू हॉस्पिटल स्थलांतर प्रस्ताव रद्द करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन

Naidu Hospital news : सजग नागरिक टाइम्स :

नायडू हॉस्पिटल हे सर्वसामान्य , मध्यमवर्गीय गरजू गरीब लोकांसाठी वैद्यकीय सेवा पुरवणारे पुणे शहरातील जागतिक पातळीवर ओळखले जाणारे हॉस्पिटल आहे.

या शिवाय नायडू हॉस्पिटलची आरोग्य सुविधा पुरविण्याची एकशे वीस वर्षांपेक्षा जास्त ऐतिहासिक गौरवशाली परंपरा आहे.

protests-in-front-of-pune-district-collectors-office-to-cancel-naidu-hospital-relocation-proposal

ज्या हॉस्पिटलने प्लेग सारख्या रोगाच्या महामारीत संशोधन करून पुणेकरांना वाचविले व पुण्याची ओळख जागतिक पातळीवर निर्माण केली.

व सध्या कोरोना या महामारीत अतिशय चांगली कामगिरी बजावली अशा नायडू हॉस्पिटलला बाणेर याठिकाणी स्थलांतर करण्याचा डाव काही राज्यकर्त्यांनी सुरू केल्याच्या माहिती वृत्तपत्राच्या माध्यमातून पुढे येत आहे.

नायडू हॉस्पिटलच्या 28 एकर जागेवर वैद्यकीय महाविद्यालय जरूर बनवा मात्र पुणे शहराच्या मध्यभागी असलेल्या

व 200 पेक्षा जास्त झोपडपट्टीधारकांना सहज हॉस्पिटल पर्यंत जाण्याची सुविधा असलेल्या नायडू हॉस्पिटल ला स्थलांतर करू नये.

व २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या जनरल बॉडी च्या मिटिंग मध्ये सर्व सभासदांनी

याचा विरोध करावा याकरिता काल नायडू हॉस्पिटल बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना निवेदन सादर करण्यात आले.

या प्रसंगी मूलनिवासी मुस्लीम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार , चारीटेबल ट्रस्ट अध्यक्ष सागाई राजेश नायर,साबीर शेख तोफखाना,

सलीम शेख, साबिर सय्यद,जमीर मोमीन, अमजद शेख,अशोक माने,आयटी शेख, राजेश नायर,मौलाना शकील, समीर शेख उपस्थित होते.

वाचा : फादर स्टॅन स्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ सत्याग्रह आंदोलन

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular