Police Newsताज्या घडामोडीपुणेब्रेकिंग न्यूज

खडक हद्दीत गुन्हेगारांची वाढली मजल सहाय्यक पोलिस निरीक्षकाला दिली जिवे मारण्याची धमकी

Advertisement

सजग नागरिक टाइम्स:

खडक पोलिस ठाण्यातील महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकाला धमकी दिल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे .

सदरील प्रकार घोरपडे पेठेतील मनपा वसाहतीत घडला आहे . याबाबत खडक पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आले आहे .

रवींद्र उर्फ सोन्या संजय खंडागळे (रा . पीएमसी कॉलनी , घोरपडे पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे . याबाबत सहायक पोलीस निरीक्षक गिरीजा म्हस्के यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार , सहायक पोलीस निरीक्षक गिरीजा म्हस्के या रात्री गस्तीवर होत्या . घोरपडे पेठेतील मनपा वसाहतीत आरोपी सोन्या खंडागळे थांबला होता . तु माझ्या भावाच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी खोटा गुन्हा दाखल केला आहे . मी तुला सोडणार नाही , अशी धमकी खंडागळे याने फिर्यादी यांना दिली .

खंडागळे याने आरडाओरडा करुन शिवीगाळ केले . शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी सोन्या खंडागळे याला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत .

Share Now