Homeताज्या घडामोडीभवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाचा भोंगळ कारभार कार्यालयास कुलूप व नेम प्लेट ऐवजी...

भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाचा भोंगळ कारभार कार्यालयास कुलूप व नेम प्लेट ऐवजी लावले कैलेडर

अधिकारीच्या नेम प्लेट ऐवजी कैलेडर लटकणारे व कार्यालयास कुलूप लावणारे हे पहीले क्षेत्रिय कार्यालय असेल !

सजग नागरिक टाइम्स: भवानी पेठ क्षेत्र कार्यालयातील स्थापत्य विभाग चर्चेत येण्याचे काही थांबत नाही, भवानी पेठ येथील उपअभियंता व कनिष्ठ अभियंता हे मीटिंगच्या नावाखाली दरवेळी लवकर घरी जात असल्याचे अनेकांनी माहिती दिली होती .

याबद्दल सजग नागरिक टाइम्सच्या प्रतिनिधीने शुक्रवारी सायंकाळी ४ .३० ते ५.४५पर्यंत पाहणी केली असता स्थापत्य विभागात ३ कर्मचारी उपस्थित होते. सायंकाळी ४.३५ च्या दरम्यान शाखा अभियंता पिरजादे आले यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही अधिकारी ५.४५ पर्यंत उपस्थित नव्हते. शाखा अभियंता पिरजादे सहित दोन ते ३ कर्मचारी उपस्थित होते.

अधिक माहिती घेतली असता सांगण्यात आले आहे की अधिकारी वर्ग मिटिंगला गेले पण कोठे मिटींगला गेले याची माहिती कोणालाच नव्हती. याबद्दल क्षेत्रिय अधिकारी तांबे मॅडम यांना उप अभियंता प्रविण शिंदे यांच्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितले की थोड्या वेळेसाठी ते माझ्यासोबत मिठीग मध्ये होते त्यानंतर कुठे आहे हे विचारून सांगते, पण अनेक वेळ झाला तरी त्यांनी काही माहिती दिली नाही तसेच इतरांबद्दल काहीही माहीती दिली नाही.

व संबंधित अधिकारी उप अभियंता प्रवीण शिंदे यांना संपर्क केला असता त्यांचा फोन स्विच ऑफ येत होता. हजेरीचे मस्टर हे उप अभियंता प्रवीण शिंदे यांच्या केबिनमध्ये असल्याने मनमर्जीप्रमाणे कोणीही कधीही हजेरी लावतो आणि घरी जातो. सुट्टी करूनही अनेक अधिकारी वर्ग हजेरी लावत असल्याची माहिती मिळाली आहे.

या सर्वांचे हजेरीचे मास्टर हे क्षेत्रीय अधिकारी यांच्या केबिनमध्ये ठेवण्याची मागणी होत आहे जेणेकरून फुकटचे पगार घेणाऱ्यांवर आळा बसेल व मिटींगच्या आडमध्ये पळ काढणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular