पुण्यातील रेशनिंग दुकानांमध्ये वेब कॅमेऱ्याद्वारे धान्य वाटपाच्या आदेशाला केराची टोपली..!

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

webcam watch ration shops : पुण्यातील काही भागात विना वेब कॅमेराद्वारे धान्य वाटपाचा प्रकार.

webcam -watch-ration-shops

webcam watch ration shops : सजग नागरिक टाईम्स : कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रातील लाॅकडाऊन ची अंमलबजावणी सक्तीने केले जात आहे.

महाराष्ट्रातील जनतेला घरा बाहेर पडता येत नसल्याने गरीब व गरजू लोकांना उपासमारीची

वेळ येउ नये यासाठी महाराष्ट्र शासन आपल्या परिणे विविध प्रयत्न करत आहे .

परंतु पुण्यातील काही रेशनिंग दुकानदार स्वताच्या हितासाठी गोर गरीब व गरजूंच्या हक्काचे अन्न धान्य पळवत असल्याचे शासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाले,

Advertisement
DIGITAL BUSINESS CARD MK DIGITAL SEVA

अन्न धान्याची चोरी थांबविण्यासाठी शासनाने परिपत्रक काढून सरकार सेवा केंद्र ( महा ई सेवा) मार्फत

प्रत्येक स्वस्त धान्य दुकानांमध्ये वेब कॅमेऱ्याद्वारे अन्न धान्य वाटप करण्याचे आदेश पारित केले होते परंतु आज पुणे शहरामध्ये सदर आदेशाचा फज्जा उडाला आहे.

पुण्यातील काही भागात आज विना वेब कॅमेऱ्याद्वारे रेशनिंग दुकानातुन अन्न धान्य वितरण केले जात असल्याचे

काहि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सजग नागरिक टाईम्स च्या प्रतिनिधींच्या निर्दशनास आणून दिले आहे.

Advertisement
Advertisement

यामुळे पुण्यातील काही रेशनिंग दुकानदारांवर संशयाची सुई गडद होत आहे.

mk-digital-seva
https://www.mkdigitalseva.com/

सरकार सेवा केंद्राचे प्रतिनिधी आले नाही किंवा त्यांना येऊ दिले नाही या बद्दल प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

यामुळे अधिकारी व पुरवठा निरीक्षक गाफिल असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.?

शासनाच्या आदेशाला खो देणाऱ्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम व शहर अन्न धान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे काय कारवाई करणार यावर लक्ष टिकून राहणार आहे.

Advertisement

वेब कॅमेऱ्याद्वारे रेशनिंगचे धान्य वाटप नको यासाठी दुकानदार अग्रेसर..?
वेब कॅमेऱ्याद्वारे धान्य वाटप केले तर धान्याचा केला जाणारा काळाबाजार त्यातून मिळणारी मलई हे सगळं जग जाहिर होईल या भितीपोटी काही दुकानदार वसीलेबाजी करत आहे असे एका प्रामाणिक दुकानदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

संशयित रुग्णांच्या क्वारंटाईनसाठी आझम कॅम्पस मस्जीद इमारतीमधील संपूर्ण मजला उपलब्ध

Spread the love