ताज्या घडामोडी

मोदी सरकारच्या राज्यात दलित मुस्लिम असुरक्षित;–भीम आर्मीची आरोप

Advertisement

पुणे शहर ;मोदी सरकारच्या राज्यात दलित मुस्लिम सुरक्षित नसल्याचे आरोप करत या निषेधार्थ केंद्र सरकारचा भीम आर्मी पुणे शहर शाखेच्या वतीने तीव्र निदर्शने करून निषेध करण्यात आला .पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासमोर झालेल्या या आंदोलनाचे नेर्तृत्व भीम आर्मी संघटनेचे पुणे जिल्हा प्रमुख दत्ता पोळ यांनी केले. .हरियाणा आंध्रप्रदेश गुजरात बिहार राजस्थान तामिळनाडू उत्तरप्रदेश तसेच महाराष्ट्रसह देशभरात दलितांवर अमानवी हल्ले होत आहेत पुण्यातील युवक मोहसीन शेख पासून अखलाक आणि जुनेद पर्यंत २३ मुस्लिम युवकांची संपूर्ण देशात गोरक्षण आणि धर्म रक्षणाच्या नावाखाली हत्या झाल्या आहेत .

गोमांस बाळगल्याच्या संशयावरून ५३ घटनेत मुस्लिम समाजावर अत्याचार करण्यात आले असून .देशाचे प्रधानमंत्री अच्छे दिन झाल्याची चर्चा करतात परंतु देशात दलित मुस्लिम सुरक्षित आहेत का याकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे . केंद्र सरकार आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडित नसल्याचे सर्व  आरोप भीम आर्मी संघटनेचे पुणे जिल्हा प्रमुख दत्ता पोळ यांनी केले  असून यावेळी पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले .त्याचप्रमाणे भीम आर्मी संघटनेचे नेते चंद्रशेखर आझाद हे उत्तर प्रदेशमध्ये दलित अत्याचारांवर संविधानिक मार्गाने आपला लढा लढत असताना व दलितांवर अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करताना त्यांना नियोजनबध्द व जाणीवपूर्वक अटक केली असल्याचे आरोप करत  त्याचा देखील निषेध व्यक्त करण्यात आला असल्याचे पोळ म्हणाले   .

Advertisement

या लिंक वर क्लिक करून फेसबुक पेजला लाईक करूनही बातम्या मिळवू शकता

दलित मुस्लिम समाजाला संरक्षण द्यावे तसेच भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांची सुटका व्हावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली  .यावेळी शहराच्या विविध भागातून कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते . यामध्ये प्रदीप कांबळे सुनिल बेंगळे ,राहुल शिंदे विवेक सावंत चंद्रकांत भोसले पावलंस सावंत विठ्ठल देवकुळे राकेश साबळे दत्ता गरुड ,बाळू गायकवाड श्रीकांत शेंडगे सदा देवनावर मामा वाघमारे विक्की जावळे ,  निखिल गायकवाड अरिफ तांबोळी हुसेन भोलावले शरद अरुण आदी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . भीम आर्मी संघटनाचे पुणे जिल्हा प्रमुख  दत्ता पोळ यांनी  अशी माहिती दिली.

आमच्या अधिक बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वर क्लिक् करा

 

 

 

 

Share Now

Leave a Reply