foodstuffs and medical shops open महाराष्ट्रामध्ये रेशन आणि खाण्यापिण्याच्या सामानांची दुकाने व मेडिकल उघडी राहतील; जनतेने घाबरून जाऊ नये- नवाब मलिक

Foodstuffs and medical shops open : सजग नागरिक टाइम्स : प्रतिनिधी मुज्जम्मील शेख : मुंबई दि. २४ मार्च – रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री 8 वाजता न्यूज चायनलवर येऊन सांगितले कि
‘आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण भारत देश लॉकडाऊन होणारआहे ‘ हे ऐकताच देशाची जनता घाबरून गेली व खरेदीसाठी रस्त्यावर उतरली यामुळे संक्रमण वाढण्याचा धोका निर्माण झाला.
महाराष्ट्रामध्ये रेशन आणि खाण्यापिण्याच्या सामानांची दुकाने व मेडिकल उघडी राहतील
त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण भारत देश लॉकडाऊन
आज रात्री १२ नंतर देशात २१ दिवसासाठी लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यावर लागलीच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लोकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.महाराष्ट्रातील अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.
घाबरू नका सर्व सामान मिळेल अशाप्रकारचे ट्वीट अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी करून जनतेला धीर दिला.