प्रभादेवीमध्ये फेरीवाल्या महिलेला झाला करोना

coronavirus : प्रभादेवीमध्ये फेरीवाल्या महिलेला झाला करोना

two-new-positive-case-of-coronavirus-in-thane-and-mumbai

coronavirus : सजग नागरिक टाइम्स : मुंबई व ठाण्यांत दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यामुळे आता महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या १२४ झाली आहे.

प्रभादेवीमध्ये खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्या एका फेरीवाल्या महिलेला करोना झाल्याचे वृत्त आहे .

महाराष्ट्रात करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणे समोर मोठे आव्हान उभे झाले आहे .

प्रभादेवीमधील एका कॉर्पोरेट ऑफिसच्या खाली या महिलेचा खाद्यपदार्थाचा व्यवसाय चालत होता.

या ठिकाणी कॉर्पोरेट कंपनीतील अनेक लोकं खाद्यपदार्थ खाण्यासाठी असत.त्यामुळे सदरील महिलेला करोना ची बाधा झाल्याचे वृत्त आहे .

खाजगी विमानांच्या एका तिकिटासाठी तब्बल 15 लाख रुपये मोजले

या महिलेला ताप आल्यावर घश्यात खवखव होत असल्याचे जाणवल्याने तिची करोना टेस्ट करण्यात आली असता

त्या महिलेचा टेस्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती मिळाली.

मुंबई व ठाण्यात आणखीन दोन करोना बाधित रुग्ण आढळल्याने महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२४ वर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासात पुण्यात एकही कोरोना बाधित रुग्ण न आढळल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

महाराष्ट्रामध्ये रेशन आणि खाण्यापिण्याच्या सामानांची दुकाने व मेडिकल उघडी राहतील;जनतेने घाबरून जाऊ नये- नवाब मलिक