ताज्या घडामोडीपुणे

27 वर्षीय प्राध्यापिकेला 54 वर्षीय प्राध्यापकाने मारली मिठी, विनयभंगाचा गुन्हा दाखल

Advertisement

विद्येचं माहेरघर म्हटलं जाणाऱ्या पुण्यामध्ये एक लज्जास्पद घटना घडली आहे. शिक्षणाचं मंदिर मानलं जाणाऱ्या एका शैक्षणिक संकुलात एका 54 वर्षीय प्राध्यापकाने त्या पेक्षा निम्म्या वयाच्या प्राध्यापिकेला तिच्या इच्छेविरुद्ध मिठी मारली आहे. या दरम्यान संबधित महिलेच्या तक्रारीनंतर त्या प्राध्यापकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत. या परीक्षेचे पेपर वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापकांकडे तपासणीसाठी देण्यात आले आहेत.

पुण्यात एका महाविद्यालयाच्या प्राध्यापकाकडे समन्वयाची जबाबदारी देण्यात आली होती.

त्यानुसार महाविद्यालयातील प्रोफेसर पेपर तपासल्यानंतर त्याच्याकडे जमा करत होते.

Advertisement

पेपर जमा करण्यासाठी या प्राध्यापकाकडे आलेल्या एका 27 वर्षीय प्राध्यापक तरुणीचा त्याने विनयभंग केला.

या प्रोफेसर तरुणीच्या इच्छेविरुद्ध तिला मिठी मारून हा विनयभंग करण्यात आला असल्याचे फिर्यादीत म्हणटले आहे.

ही घटना सोमवारी (4 एप्रिल) दुपारच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील एका शैक्षणिक संकुलात घडली आहे..

या घटनेनंतर संबंधित प्रोफेसर तरुणीने आपल्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. कुटुंबियांनी पोलीस स्टेशन गाठून संबंधित प्रोफेसर विरोधात तक्रार दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून विकास पवार असे या प्राध्यापकाचे नाव असून याला अटक करण्यात आली आहे.

Share Now