Homeताज्या घडामोडीयेरवडा येथे शिवशाही बसला आग, चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली

येरवडा येथे शिवशाही बसला आग, चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली

पुणे: प्रतिनिधी पुणे येथील येरवडा भागात ST महामंडळाच्या शिवशाही बसने आज रोजी दि. 1 नोव्हे. सकाळी 11 वा. अचानक पेट घेतला बस क्रमांक एमएच ०६ डीडब्लू ०३१७ असा असून शिवशाही बस यवतमाळ ते पुणे असा प्रवास करत होती. मंगळवारी सकाळी बस येरवडा परिसरातील शास्त्रीनगर येथील गलांडे हॉस्पिटलच्या शेजारी आली असता बसने अचानक पेट घेतल्याचे ड्रायव्हर, बस चा कंडक्टर व प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले.

ही शिवशाही बस शिवाजी नगर बस डेपो कडे निघाली होती असे ड्रायव्हर कडून समजते,बस ला आग लागलेल्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाली, व लगेच आग विझवण्याचे काम सुरू केले त्यामुळे परिसरात यावेळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमा झाल्यामुळे ट्राफिक जाम झाले होते अग्निशमन दलाने काही वेळातच आग आटोक्यात आणून मोठी दुघटना टळली.

ही शिवशाही बस यवतमाळ येथून निघाल्या पासून सारखी गरम होत असल्याने तिला पाणी टाकून पुण्याच्या दिशेने आणण्यात येत होते असे प्रवश्यांनी व वाहकाने सांगितले,काही प्रवासी खराडी येथे उतरल्यानंतर थोड्याच अंतरावर शास्त्रीनगर येथे बस आली असता खूपच जास्त गरम झाल्यामुळे बसने अचानक पेट घेतला, बस मध्ये कोणीही प्रवासी नसल्याने मोठी घटना टळली, यावेळी बस चालक आणि वाहक यांनी तात्काळ बस कडेला घेऊन बसमधून बाहेर पडले प्रसंगावधानाने लगेच बाहेर पडल्यामुळे त्यांचे प्राण वाचले असे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांनी सांगितले.

Share Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments