lockdown : पुणे पोलीस आयुक्तांकडे करणार तक्रार.

Lockdown : सजग नागरिक टाइम्स प्रतिनिधी : सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू आहे
तर शासकीय अधिकारी व कर्मचारी कोरोना व्हायरस संपविण्यासाठी दिवसरात्र कामाला लागले आहे.
त्यात राज्य शासनाने शासकीय कार्यालयात दररोज ५ टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे.
त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहवेच लागत आहे.
पुण्यात कोरोना व्हायरसचा पहिला बळी: कोरोनाबाधितांची संख्या 215

तर मंगळवारी सकाळी कामावर निघालेल्या पुणे महानगर पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे.
रमेश ढोकळे हे कर्मचारी ज्ञानेश्रवर पादुका चौकातून येत होते त्या रस्त्यावर थांबलेल्या पोलीसांनी ढोकळे यांना अडवून विचारपूस न करता काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली
ढोकळे यांनी पालिकेचे ओळखपत्र दाखवून हि पोलीस ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.ढोकळे यांच्या पाठिवर,खांघावर गंभीर मार लागला आहे.
या प्रकाराची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून पोलिस आयुक्तांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
1000 हून जास्त लोकं निजामुद्दीन मरकजमध्ये अडकून पडले यास जबाबदार कोण ?
सध्या Viral होणारा पोलिसांचा व्हिडिओ इचलकरंजीचा