Petrol pumps :जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून नागरिकांना पेट्रोल देणाऱ्या पंपावर गुन्हे दाखल
Petrol pumps : सजग नागरिक टाईम्स, प्रतिनिधी : पुणे – कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊन मध्ये सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल देऊ नये
असे आदेश पुणे जिल्हाधिकारी व राज्य शासनाचे असताना देखील पुण्यातील काही पेट्रोल पंप सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल विक्री करत असल्याचे उघडकीस आले
यामुळे पुण्यातील सात पेट्रोल पंपावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1000 हून जास्त लोकं निजामुद्दीन मरकजमध्ये अडकून पडले यास जबाबदार कोण ?
गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत एकूण सात पेट्रोल पंपावर ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी सांगितले की जिल्हाधिकाऱ्यांनी अनावश्यक या लोकांना पेट्रोल विक्री करण्यास बंदी घातली आहे
तरी लोकांना पेट्रोल मिळत असल्याने नागरिक रस्त्यावर फिरत आहे ,
यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या सात पेट्रोलपंपावर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे मोराळे यांनी सांगितले.