ताज्या घडामोडीलेख

आपले ‘अडकले’, त्यांचे ‘लपून बसले’

Advertisement

Tablighi jamaat : निजामुद्दीन १९२८ साली सुरू झालेल्या तबलीग जमातचे मर्कज अर्थातच मुख्यालय आहे.

exactly-what-the-tablighi-jamaat-does

Tablighi jamaat : दिल्लीचे निजामुद्दीन १९२८ साली सुरू झालेल्या तबलीग जमातचे मर्कज अर्थातच मुख्यालय आहे. मुख्यालय म्हणजे एखादी खोली नसते.

कोणत्याही संघटनेच्या विस्तारानुसार त्याच्या मुख्यालयाचा व्याप आणि तेथील वर्दळ वाढत जाते.

भारतातून सुरू झालेली तबलीग जमात आज जगातील किमान ५० राष्ट्रांत पसरली आहे. म्हणजे निजामुद्दीन केवळ भारताचे नव्हे तर जगाचे मुख्यालय आहे.

जगातील समस्त संस्था आणि संघटनांकडे असतात त्याप्रमाणे ( Tablighi jamaat ) जमातकडेदेखील स्वयंसेवक आहेत.

आपले सर्वस्व जमातसाठी अपर्ण करून जमातसाठी समर्पित होणारे दिवसाचे २४ तास, वर्षाचे बारा महिने मर्कजमध्येच राहतात.

1000 हून जास्त लोकं निजामुद्दीन मरकजमध्ये अडकून पडले यास जबाबदार कोण ?

जमातची कार्यपद्धतीही सोपी आहे, सामान्य माणसाच्या मनाला साद घालणारी आहे, म्हणून रस्त्याने चालताना दिसणारा प्रत्येक दुसरा मुस्लिम जमातचा सदस्य आहे.

नेमके काय करते जमात? जमात एक निर्धारित कालावधीसाठी लोकांना जगाच्या धावपळीतून बाहेर काढून अध्यात्मिक शुद्धतेसाठी त्यांना मस्जिदीमध्ये रोखून ठेवते.

यासाठी कमीतकमी ३ दिवसांचे तर जास्तीत जास्त एका वर्षाचे प्रवास दौरे आयोजित केले जातात. तीन ते दहा दिवसांचे प्रवास दौरे स्थानिक पातळीवर असतात.

या दिवसांत जमातचे सदस्य स्थानिक मस्जिदीचा दौरा आखून तेथे अध्यात्मिक शुद्धतेसाठी प्रयत्न करतात.

तर ४० दिवसांचा दौरा आंतरजिल्हा पातळीवर आयोजित केले जातात. म्हणजे एक जिल्ह्याचे सदस्य दुसऱ्या जिल्ह्यातील मस्जिदीकडे दौरा आखतात.

हा दौरा एकाच राज्यातील जिल्ह्यात किंवा इतर राज्यातील जिल्ह्यात दोन्ही प्रकारच्या असतो.

शेवटचा दौरा असतो एक वर्षाचा. हा दौरा आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रांतर्गत दोन्ही प्रकारच्या असतो.

पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला पोलिसांची मारहाण..

दौरा म्हणजे काय? तबलीग जमातचा प्रत्येक सदस्य किमान ३ दिवसांसाठी तर जास्तीत जास्त १ वर्षासाठी आपले घरदार,

व्यापार व्यवसाय अर्थातच या जगाची धावपळ सोडून फक्त आणि फक्त अध्यात्मिक शुद्धतेसाठी स्वतःला मस्जिदीत रोखून धरतो,

मात्र ही अध्यात्मिक शुद्धी इतरांच्या सुधारनेतून प्राप्त केली जाऊ शकते, या विचाराने इतर मुस्लिमांची सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत राहतो.

या उद्देशासाठी देशभरात अक्षरशः लाखो सदस्य रोजच्या दिवशी एक शहरातून दुसऱ्या शहरात आणि एक राज्यातून दुसऱ्या राज्यात आणि एक देशातून दुसऱ्या देशात जातात.

Advertisement

यावेळी देखील हेच घडले. प्रधानसेवकाने रातोरात बंदचा निर्णय घेतल्याने असंख्य लोक जेथे होते तेथेच अडकून पडले.

वर्क फ्रॉम होमचा आनंद घेणारा ‘उच्च वर्गीय’ कर्मचारी वर्ग, अडकलेल्या कामगारांच्या समस्या समजू शकत नाही.

ज्याप्रमाणे देशभरात मजुरी करणारे कामगार अनेक ठिकाणी अडकले, अगदी तसेच तबलीग जमातचे सदस्यही ते होते तेथेच अडकले.

इतर राज्यांनी प्रधान सेवकाच्या जनता कर्फ्युनंतर काही दिवसांचा दिलासा देऊन जमावबंदी लागू केल्याने इतर ठिकाणी तितके भीषण चित्र उभे राहिले नाही,

जितके भीषण चित्र दिल्लीत उभे राहिले आहे. लोक दिल्लीच्या केवळ निजामुद्दीनमध्येच अडकलेली नाहीत तर दिल्लीच्या रस्त्यांवर देखील उतरलेली आहेत.

रस्त्यांवर उतरणाऱ्यांची संख्या मर्कजमध्ये अडकणाऱ्यांच्या संख्येच्या दहापट जास्त आहे.

तसेच ज्याप्रमाणे लोक मर्कजमध्ये अडकले आहेत तसेच लोक इतर देवस्थानी देखील अडकले आहेत.

मर्कजमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी जमात प्रमुखातर्फे शासनाला वारंवार याचना केल्याचे पुरावे समोर आले आहेत.

मात्र हे वास्तव दडवून हे सारे चित्र अशाप्रकारे रंगविले जात आहेत जसे हे लोक कोरोनाबधित असून त्यांना लपवून ठेवण्यात आले होते.

भारतीय मीडियाची मानसिकता सैतानाला लाजवेल इतकी नीच पातळी गाठत आहे.

इतर देवस्थानी असलेल्या भाविकांसाठी ‘अडकले’ आणि मर्कजमध्ये ‘लपून बसले’ हा शब्दप्रयोग मीडियाचा निचपणा उघड करण्यासाठी पुरेसा आहे.

ज्याप्रमाणे दाढीटोपी म्हणजे कट्टरवादी प्रतिमा रंगविण्यात आली अगदी तशाचप्रकारे सद्य परिस्थिती दोन चार मुस्लिम एकत्र अडकलेले सापडले की त्यांना कोरोना बॉम्ब म्हणून सादर केले जात आहे.

सध्या भारताला कोरोनापेक्षा मोठा खतरा गोदि मिडिया कडुन|

दुःखदायक भाग हा आहे की दिवसरात्र मुस्लिमांसोबत वावरणारे, राहणारे, खाणारे आणि मुस्लिमांच्या सामाजिक अवस्थेला अंतर्बाह्य जाणारे देखील अशा प्रसंगांना कॅश करीत आहेत.

गुड मुस्लिमची प्रतिमा रंगविणाऱ्या मानसिक गुलामांना वाटते की स्वतःला पुरोगामी सिद्ध केल्याने समस्या सुटेल,

मात्र जेव्हा त्यांना देखील याच प्रश्नच सामना करावा लागतो तेव्हा विचलित होऊन डोके बडवीत फिरू लागतात.

मुळात यासारख्या समस्त घटनांमागे मुस्लिमांचा फोबिया नसून इस्लाम फोबिया आहे.जो तोपर्यंत संपणार नाही, जोपर्यंत तुम्ही इस्लाम त्यांच्यापर्यंत पोहोचवीत नाही.

इस्लामबद्दल त्यांच्या मनात असणाऱ्या शंकाचे निरसन करीत नाही आणि त्यांना अल्लाहचा संदेश देत नाही.

पोस्टशी सहमत असाल तर तुमच्या वॉलवर (स्वतःच्या नावाने) कॉपीपेस्ट करू शकता.

© Mujahid Shaikh

Share Now