ताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील मुस्लीम समाजाने केले हिंदू आजीचे अंत्यविधी

Advertisement

funeral of hindu oldlady : लोहियानगर भागातील मुस्लीम समाजाचा पुढाकार

Funeral-of-Hindu-oldlady-performed-by-Muslim-community-in-Lohianagar-area

funeral of hindu oldlady : सजग नागरिक टाइम्स : पुणे : जगभरात करोनाचा संसर्ग वाढला आणि बघता बघता तो भारतात ही पसरला याला रोकण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन घोषित केले.

लाॅकडाऊन घोषित झाल्यापासून मोहम्मदिया मस्जिद ट्रस्टच्या वतीने लोहियानगर भागातील गरजू नागरिकांना दोन वेळचे जेवण वाटपास सुरुवात करण्यात आली,

अशावेळी मस्जिदच्या सदस्यांना लोहियानगर मध्ये राहणाऱ्या 85 वषीय शेवंताबाई जाधव या वृद्ध महिला भेटल्या .

त्यांच्या घराची परिस्थिती खूपच घाण झालेली होती सर्वत्र उंदीर व खुशीचे साम्राज्य होते,

मस्जिद ट्रस्टच्या सदस्यांनी घरातील सर्व कचरा व घाण साफ केली व त्यांना लाईटची व्यवस्था करून दिली .

त्यांना कोणीही वारसदार नाही हे लक्षात येताच गेला महिनाभर त्यांना दोन वेळचे जेवण देण्यास सुरुवात केली आणि त्यांची सेवा केली.

Advertisement

मात्र दिनांक 5/4/20 रोजी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या नातेवाईकांची शोधाशोध करण्यात आली परंतु त्यांच्याजवळ त्यांचा कोणीही नातेवाईक नाही,

Funeral of Hindu oldlady performed by Muslim community in Lohianagar area

अशी माहिती मिळाल्यानंतर मोहम्मदिया मस्जिद ट्रस्ट व खतीजा मस्जिद ट्रस्ट ने निर्णय घेतला कि त्यांचा अंत्यविधी आपणच करू, त्यासाठी त्यांची धावाधाव सुरूझाली

मस्जिद ट्रस्ट च्या वतीने त्यांच्यावर हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे अंतिम संस्कार करण्यात आले.

यावेळी माजी. स्वीकृत सभासद : युसूफ शेख ,समीर शेख, शेरू शेख, अरशद साय्येद, राशीद बावा, जैद शेख, हूसैन शेख,

अजहर शेख , शाहरूख हवा, जहॉंगीर भाई, बीलाल भाई, नासीर शेख, रज्जाक बागवान, मोहसीन जन्नत, वसीम शेख यांनी विशेष प्रयत्न घेतले.

तसेच या वेळेस ट्रस्टच्या सदस्यांना लोहियानगर पोलीस चौकीचे निरीक्षक गणेश माने यांनीही विशेष सहकार्य केले.

Share Now