ताज्या घडामोडीरमजान स्पेशललेख

जकात अदा करण्याचे पुण्य

Advertisement

Virtue of paying Zakat : जकात आदा करण्याचे पुण्य : रमजानुल मुबारक – १६

Virtue of paying Zakat

Virtue of paying Zakat : सजग नागरिक टाइम्स ; पवित्र रमजान महिन्यांमध्ये रोजा ,नमाज, तरावीह याबरोबरच आदा केले जाणारे महत्त्वाचे कर्तव्य म्हणजे जकात देणे होय .

प्रत्येक ऐपतदार (साहिब ए निसाब )व्यक्तीवर दरवर्षी त्याच्या एकूण वार्षिक व्यवहारातून झालेल्या नफ्यावर शेकडा अडीच टक्के जकात देणे फर्ज आहे .

जकात म्हणजे इस्लामी टॅक्स.जो समाजातील गरजू व गरीब घटकांच्या मदतीसाठी वापरला जातो.

जगामध्ये इन्कम टॅक्स आणि सेल टॅक्स म्हणजे आयकर व विक्रीकर देण्याची पद्धत आहे. परंतु इस्लाम मध्ये तुम्हाला जे उत्पन्न मिळाले आहे,

त्यातून जो नफा झाला आहे, त्या नफ्यावर तुमच्या मर्जीने टॅक्स म्हणून जकात आदा करावयाची आहे.

कुरआन ए पाकचा संदेश

विक्री करामध्ये चोरी केली जाते.उत्पन्न दडवले जाते. विक्री लपविली जाते.जकाती मध्ये मात्र झालेला नफा लपवता येत नाही. जकातीच्या टॅक्स रुपी रकमेची चोरी करता येत नाही.

खोटी रक्कम अदा करता येत नाही. कारण नफा आपला असतो.त्यावर जकात आदा केल्याने आपली एक जबाबदारी पूर्ण होते .

या जकातीच्या आदा करण्यामध्ये काही अफरातफर केल्यास होणारे नुकसान देखील आपलेच असते व गुन्हा सुद्धा आपल्याच नावावर नोंदवला जातो .

अल्लाहचा महिना – रमजान

ही जाणीव असल्यामुळे कोणतीही व्यक्ती जकात आदा करण्यापासून कुचराई करीत नाही.
समाजातील दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आणि समाजातील सर्वांना समान न्याय,

समान आनंद, समान संधी देण्यासाठी जकातीची व्यवस्था रुढ झालेली आहे. जे लोक आपल्या सर्व प्रकारच्या कारभारावर, वार्षिक उत्पन्नावर जकातीची रक्कम अदा करतात,

Advertisement

अल्लाहच्या नजरेमध्ये ते फार भाग्यवान आहेत. गोरगरिबांच्या गरजा पूर्ण करुन पुण्य कमावण्याची संधी अल्लाहतआला ने त्यांना उपलब्ध करून दिलेली असते.

प्रत्येक जण या संधीचं सोनं करण्यासाठी आतुर झालेला असतो.

एकटया आपल्या भारत देशामध्ये सरकारी टॅक्स शिवाय या देशातील मुस्लिम बांधव अब्जावधी रुपये जकात म्हणून दरवर्षी देत असतात.

शासकीय कर व धार्मिक कर अशाप्रकारे दुहेरी कर ते आदा करतात .समाजातील अनाथ, विधवा, आजारी रुग्ण व सर्व प्रकारच्या गरजू घटकांना जकातच्या रूपातून मदत दिली जाते.

 नागरिकांना Ration मिळावे म्हणुन Mohammadiya Masjid Trust चा पुढाकार

देशातील सर्व अरबी मदरसे हे या जकातीपासून मिळणाऱ्या रक्कमेवर चालत असतात.

अलीकडे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत

नसल्याने जकातीच्या रकमेपासून ट्रस्ट स्थापन करून अशा मुलांच्या उच्च शिक्षणाला हातभार लावला जात आहे. ही एक चांगली गोष्ट आहे.

आज मुस्लिम समाजाच्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि या समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आर्थिक सुधारणांची खूप गरज आहे.

कोरोना आणि वजु

दुर्दैवाने केंद्र सरकार तर पूर्णपणे मुस्लिम समाजाचे किती हितरक्षण करते हे जगजाहीर आहे. राज्य सरकारकडून ही फार अपेक्षा नाहीत.

परंतु जोपर्यंत मुस्लिम समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेऊन इतर घटकांबरोबर विकासाच्या समान संधी मिळत नाहीत,

तोपर्यंत हा समाज प्रगती करू शकत नाही.सध्यातरी समाजाच्या मूलभूत गरजा या समाजातील जकातीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून भागविल्या जातात.

जकातीची एक आदर्श व्यवस्था इस्लामने जगाला दिलेली आहे. तिचा सुयोग्य वापर करून प्रत्येक समाज आणि देश आपली प्रगती करू शकतो (क्रमशः)

सलीमखान पठाण
9226408082.

Share Now

One thought on “जकात अदा करण्याचे पुण्य

Comments are closed.