ताज्या घडामोडीरमजान स्पेशललेख

अल्लाहचा महिना – रमजान

Advertisement

The month of Allah -Ramadan : रमजानुल मुबारक – १ , अल्लाहचा महिना – रमजान

The month of Allah -Ramadan

The month of Allah -Ramadan : सजग नागरिक टाइम्स : सालाबाद प्रमाणे यावर्षीच्या रमजान मासा ला आजपासून प्रारंभ झाला आहे .

काल सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतरच रमजान ची एक तारीख आणि इस्लामी जगातील सर्व लोकांचे दैनंदिन जीवन बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली .

जगभरातील मुसलमान रमजान महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात.भक्ती (इबादत ) चा महिना म्हणून रमजान महिन्याची गणना केली जाते

हजरत पैगंबरांनी या महिन्याला अल्लाहचा महिना म्हणून संबोधले आहे . यावरून या महिन्याची महती लक्षात येते .

रोजा, नमाज, तिलावत, जकात,दानधर्म या सर्व गोष्टींचे पालन करून पूर्ण महिना अल्लाहच्या नामस्मरणाने घराघरातील वातावरण मुग्ध झालेले असते .

पावित्र्याचा परिपाक -रमजान

mk-digital-seva
https://mkdigitalseva.com/

प्रत्येक जण जास्तीत जास्त ईश्वर आराधना करून वर्षभरातील स्वतःच्या चुकांचे पापक्षालन आणि अल्लाहची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करीत असतो .

त्यासाठी दाखवलेले सर्व सत्मार्ग अवलंबिले जातात .रोजेदाराच्या रोजाचे परिमान पुण्य रुपात किती द्यावे याची जबाबदारी साक्षात अल्लाहने घेतलेली असल्यामुळे प्रत्येक जण रोजे धरून त्याला प्रसन्न करण्यासाठी आतुर असतो .

त्यासाठी १४ ते १५ तास उन्हाची किंवा उष्णतेची पर्वा न करता केवळ अल्लाहची भीती मनात ठेवून रोजे धरले जातात .

Advertisement

सत्कार्याचा प्रोत्साहक – रमजान

सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी पासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो .
मागील सर्व वर्षांपेक्षा यावर्षीच्या रमजान महिन्याची पार्श्वभूमी वेगळी आहे .

कोरोना सारख्या एका छोट्याश्या विषाणूमुळे सर्व जग जवळपास बंद झाले आहे . लाखो लोक आत्तापर्यंत मृत्युमुखी पडले आहेत .

पुढे अजून काय वाढवून ठेवले आहे याची कुणाला कल्पना नाही . प्रत्येक देशाला याची झळ पोहोचलेली आहे .

एक अति सुक्ष्म असा विषाणू संपूर्ण जगाची व्यवस्था बदलून टाकेल हे जर तीन महिन्यापूर्वी कुणाला सांगितलं असतं तर कुणालाच पटलं नसतं .

परंतु आज त्याचा अनुभव प्रत्यक्ष जग घेत आहे . सगळ्या महासत्ता त्याच्या पुढे हतबल झाल्या आहेत . या जगाला चालवणारी एक अद्भुत शक्ती आहे .

तिला आम्ही अल्लाह, ईश्वर, गॉड म्हणतो . निसर्ग म्हणतो . तोच या जगाचा पालनहार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय .

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नमाज साठी मशिदींमध्ये गर्दी न करण्याचे आवाहन सरकार बरोबरच जगभरातील सर्व उलेमांनी केली आहे .

सर्व मुस्लिम बांधवांनी त्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे . कुटुंबाच्या आणि आपल्या संरक्षणासाठी सर्वांनी ही पथ्ये पाळली पाहिजेत .

घरात राहून अल्लाहची प्रार्थना करा . त्याची मर्जी संपादन करा आणि हा रोग जगभरातून लवकरात लवकर नष्ट होण्यासाठी सर्वांनी मनोभावे दुआ,प्रार्थना करा.धन्यवाद.

(क्रमशः) सलीमखान पठाण ९२२६४०८०८२

Hadapsar | Lockdown च्या काळात Smile Foundation तर्फे गरजुंना रेशनकिट ची मदत

Share Now

14 thoughts on “अल्लाहचा महिना – रमजान

Comments are closed.