Homeताज्या घडामोडीरहमत आणि मगफिरत

रहमत आणि मगफिरत

Mercy and forgiveness : पवित्र रमजान महिन्याचा रहमत (कृपादृष्टी ) चा कालखंड आज रोजी पूर्ण होत आहे.

the-period-of-mercy-and-forgiveness-of-the-holy-month-of-ramadan

Mercy and forgiveness : सजग नागरिक टाइम्स :पवित्र रमजान महिन्याचा रहमत (कृपादृष्टी ) चा कालखंड आज रोजी पूर्ण होत आहे .

रमजानचे पहिले दहा दिवस रहमत (कृपा) ,दुसरे दहा दिवस मगफिरत अर्थात (माफी) आणि तिसरे दहा दिवस जहन्नम पासून मुक्तीचा कालावधी म्हणून गणले जातात .

कृपादृष्टीचा काळ आज पूर्णत्वास जात आहे .अल्लाहतआला आपल्या भक्तांवर सतत कृपा करीत असतो .

त्यांच्या आवाक्या पेक्षा जास्त ओझे तो कधीच त्यांच्यावर टाकत नाही . तो खूप दयालू आहे . भक्तांनी केलेल्या अनेक चुका तो झाकून ठेवीत असतो .

अल्लाहचा महिना – रमजान

तो कधी कुणाची गुपितं उघड करीत नाही.जे लोक इतरांची गुपितं उघड करीत नाहीत अशा भक्तांना तो पसंत करतो .

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे लोक इतरांची गुपित (ऐब) झाकतात . कयामतच्या दिवशी त्यांची गुपितं सुद्धा झाकली जातील . ती अल्लाह शिवाय कोणालाच माहिती होणार नाहीत .

हदीस शरीफ नुसार हजरत पैगंबरांनी म्हटले आहे कि तुम लोगो के ऐबो को छूपाओ,अल्लाहतआला तुम्हारे ऐबो को छुपायेगा .

दैनंदिन जीवनामध्ये एकमेकाच्या अनेक गुप्त गोष्टी आपल्याला माहीत असतात. काहीवेळा त्या सांगितल्याने फायदा होतो तर अनेक वेळा नुकसान होते.

आपल्या हातून कोणाचे नुकसान होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.एखादी गोष्ट माहीत झाल्यास तिचा गावभर गवगवा करण्याची सवय असणाऱ्या प्रवृत्ती समाजात असतात.

कुणाचे चांगले होणार असेल तर असा गवगवा करण्यास काहीच हरकत नाही. परंतु जर कोणाचे नुकसान होणार असेल तर अश्या वेळी अशा गोष्टीवर पडदा टाकला पाहिजे.

असं समाजामध्ये सर्वसाधारणपणे बोलले जाते. समाजाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी अनेक गोष्टी आपल्या मनाविरुद्ध झाल्या तरी संयम पाळून सहन कराव्या लागतात.

आपल्यामुळे कुणाचा प्रपंच, कुणाची प्रतिष्ठा, इभ्रत, धुळीस मिळणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. हीच शिकवण इस्लाम धर्माने दिली आहे.

मानवाकडून कधी अनावधानाने तर कधी जाणीवपूर्वक काही गोष्टी केल्या जातात. यामध्ये काही प्रकरणे नाजूक असतात.

अशावेळी या गोष्टी जगजाहीर झाल्या तर कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते.

त्यावेळी अत्यंत काळजीपूर्वक पावले उचलून कुणाचेही नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली गेली पाहिजे .

दररोजच्या जीवनामध्ये अनेक प्रसंगांना आपल्याला सामोरे जावे लागते. अशावेळी नेमका कोणता निर्णय घ्यावा हे उमजत नाही.

कष्टात सवलत दयावी…

mk-digital-seva

या सर्व गोष्टींबाबतचे मार्गदर्शन कुरआन शरीफ मध्ये केलेले आहे . त्यासाठी कुरआन समजून-उमजून वाचण्याची व समजून घेण्याची आवश्यकता आहे .


रमजान महिन्याचा कृपा दृष्टीचा कालावधी आज संपन्न झाल्यानंतर उद्यापासून मगफिरत( माफी )चा दहा दिवसाचा कालावधी सुरू होणार आहे .

याकाळात प्रत्येकाने अल्लाहची माफी मागावी . आपण केलेल्या सर्व प्रकारच्या कृत्यांसाठी माफी आवश्यक आहे .

माफी मागणे आणि माफ करणे यामध्ये सुद्धा अंतर आहे . बदला घेण्यापेक्षा माफ करणारा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो .(क्रमश:)

सलीमखान पठाण
9226408082

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular