२६वर्ष जुना अडीच किलो ट्यूमर (Tumor)१७ तासांच्या शस्त्रक्रि येनंतर काढला

२६ वर्षीपासूनचा  ट्यूमर (Tumor) १७ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर काढला

The 26 year-old tumor was removed after 17 hours of surgery

Pune:महिलेच्या छाती जवळील अडीच किलो कॅन्सरचा ट्यूमर (Tumor) काढण्यास डॉक्टरांना यश

· २६ वर्षापासून असलेल्या ट्यूमरमध्ये आढळले कॅन्सरचे विषाणू

· डॉक्टरांच्या १७ तासाच्या शर्तीच्या प्रयात्नानंतर मिळाली अडीच किलोच्या ट्यूमर पासून मुक्तता

४७ वर्षीय भाग्यश्री मांगले यांचा २६ वर्ष जुना असलेला छाती व खांद्यामधील ट्यूमर काढण्यात ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश मिळाले आहे.

अतिशय दुर्मिळ आणि अनोखी शस्त्रक्रिया(surgery) यावेळी भाग्यश्री यांच्या वर करण्यात आली.

खांदा आणि छातीच्या मध्ये आलेल्या ट्यूमर कडे अनेक वर्ष भाग्यश्री यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे त्याचे रुपांतर कर्करोगाच्या ट्यूमर मध्ये झाले.

मुळच्या रोहा, जिल्हा रायगडच्या असणाऱ्या भाग्यश्री मांगले या पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल, 

बाणेर येथे उजव्या हाताचे दुखणे व अर्धांगवायूच्या उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये आल्या होत्या.

यावेळी डॉक्टरांच्या असे निदर्शनास आले की त्यांच्या छाती व खांद्याच्या मध्ये २० सेंटीमीटर एवढा मोठा ट्यूमर आहे.

हा ट्यूमर त्यांना १९९३ साला पासून असून तो कमी करण्यासाठी त्यांनी काही शस्त्रक्रिया देखील केल्या होत्या मात्र त्या अयशस्वी ठरल्या.

त्यांनी एलोपॅथिक व आयुर्वेदिक उपचार केले तसेच काही ढोंगी डॉक्टरांच्या उपचारामध्ये त्या ट्यूमर वर गोंदवून देखील घेतले होते,मात्र कोणताही गुण आला नाही.

आता तो ट्यूमर एवढा मोठा झाला होता की त्यामुळे श्वासनलिका दबली जाऊन त्यांना श्वासोच्छवास घेणे अशक्य होत होते.

तसेच उजव्या हाताकडे जाणाऱ्या सर्व रक्त वाहिन्या देखील दाबल्या गेल्या होत्या व हात निकामी झाला होता.

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा भोंगळ कारभार

यावर ज्युपिटर हॉस्पिटल मधील ओन्कोलॉजिस्ट आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. आशिष पोखरकर म्हणाले की

“अडीच किलोचा हा ट्यूमर खांद्या व छातीच्या अवघड अशा भागात पसरला होता.

तो काढण्यासाठी रुग्णाचे कॉलर हाड व छातीचे स्नायू कापावे लागले. तसेच हा ट्यूमर तेथील नसांमध्ये गेला होता.

या शस्त्रक्रिये दरम्यान आमची पहिली प्राथमिकता रक्तवाहिन्या वाचवणे व त्याच वेळी कॉलर हाडाचे पुनर्निर्माण करणे ही होती.

१७ तास चाललेली ही शस्त्रक्रिया अनोखी असून यात ज्युपिटर हॉस्पिटलमधील अनेक तज्ञांचे योगदान आहे.“

यावेळी ज्युपिटर हॉस्पिटलचे प्लॅस्टिक सर्जन डॉ. राहुल दलाल म्हणाले कि “ ही पुण्यातील नव्हे तर भारतातील दुर्मिळ केस आहे.

फक्त २ केळ्याचं बिल ४४२ रु देणाऱ्या हॉटेलला २५ हजारांचा दंड

पुण्यातील अनेक दिग्गज डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला होता मात्र ज्युपिटर हॉस्पिटलने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.

आता रुग्णाची प्रकृती चिंताजन नसून त्यांना घरी देखील सोडण्यात आले आहे.”या शस्त्रक्रियेमध्ये ओन्कोलॉजिस्ट आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. आशिष पोखरकर, 

प्लॅस्टिक सर्जन डॉ. राहुल दलाल, भूलतज्ञ डॉ. ब्रिश्निक भट्टाचार्य तसेच डॉ. परितोषा दलाल व डॉ. अमित पाटील यांचा देखील समावेश होता.

One thought on “२६वर्ष जुना अडीच किलो ट्यूमर (Tumor)१७ तासांच्या शस्त्रक्रि येनंतर काढला

Leave a Reply